AI Impact On jobs | एआय शाप की वरदान?

9.2 कोटी नोकर्‍या जाणार; पण 17 कोटी नव्या संधींचीही निर्मिती!
AI Impact On jobs
एआय शाप की वरदान?Pudhari Photo
Published on
Updated on
Summary

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा अहवाल

2030 पर्यंत मोठी उलथापालथ होणार

पारंपरिक कौशल्ये कालबाह्य होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे जागतिक नोकरीच्या बाजारात मोठी खळबळ उडाली असून येणारी वर्षे नोकरदारांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (थएऋ) ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ नुसार, 2030 पर्यंत जगभरात तब्बल 9.2 कोटी नोकर्‍या संपुष्टात येऊ शकतात. मात्र, याच काळात तंत्रज्ञानावर आधारित 17 कोटी नवीन नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यताही या अहवालात वर्तवण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, ज्यांच्याकडे जुनी कौशल्ये आहेत त्यांच्या नोकरीवर गंडांतर येईल, तर नवीन कौशल्ये आत्मसात करणारेच या स्पर्धेत टिकून राहतील.

एका सर्वेक्षणानुसार, आज जे काम 100 लोक करतात, तेच काम 2030 पर्यंत केवळ 59 लोक करतील. यामुळे कंपन्यांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होत आहेत. सर्वेक्षणानुसार, 85 टक्के कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना नवीन कौशल्ये (अपस्किल) शिकवण्याच्या तयारीत आहेत, तर 70 टक्के कंपन्या नवीन कौशल्ये असलेल्या लोकांना नोकरी देण्यास प्राधान्य देत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 40 टक्के कंपन्यांनी जुनी कौशल्ये असलेल्या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. मायक्रोसॉफ्ट, टीसीएस, इंटेल, गुगल, मेटा आणि अ‍ॅमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांनी नुकतीच लाखो कर्मचार्‍यांची कपात केली आहे, जे या बदलाचेच संकेत आहेत.

दुसरी बाजू दिलासादायक

एकीकडे नऊ कोटी नोकर्‍या धोक्यात असल्या तरी दुसरीकडे 17 कोटी नवीन संधी निर्माण होणार आहेत, ही एक दिलासादायक बाब आहे. याचा अर्थ नोकर्‍या संपणार नाहीत तर त्यांचे स्वरूप बदलेल. जुन्या आणि पारंपरिक कामांची जागा आता तंत्रज्ञान घेईल, तर एआय, बिग डेटा आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी असेल.

AI Impact On jobs
National Sports Day: सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला उर्जितावस्थेची गरज

कोणत्या नोकर्‍या आणि कौशल्ये टिकतील?

2030 पर्यंत शारीरिक कौशल्ये, सहनशक्ती आणि अचूकतेची मागणी कमी होईल. याउलट तांत्रिक ज्ञान आणि कौशल्यांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त होईल.

सर्वाधिक मागणी असलेली कौशल्ये : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), बिग डेटा, नेटवर्क आणि सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान.

मागणी वाढणारे कर्मचारी : सर्जनशील विचार करणारे (उीशरींर्ळींश ढहळपज्ञशीी), परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे (अवरिींरलश्रश) आणि नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असणारे लोक.

थोडक्यात, एआयमुळे नोकरीच्या बाजारात एक मोठी उलथापालथ निश्चित आहे. या बदलाच्या लाटेत टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी कर्मचार्‍यांना स्वतःला सतत अपडेट ठेवणे आणि काळाची गरज असलेली नवीन कौशल्ये शिकणे अनिवार्य ठरणार आहे.

AI Impact On jobs
Pathardi highway bridge collapse: राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एवढी वाताहत; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

या 10 नोकर्‍यांवर सर्वाधिक धोका

1. पोस्टल सर्व्हिस क्लर्क

2. बँक टेलर आणि संबंधित क्लर्क

3. डेटा एंट्री ऑपरेटर

4. कॅशियर आणि तिकीट क्लार्क

5. प्रशासकीय सहायक आणि कार्यकारी सचिव

6. डिझाईन प्रिंटिंग आणि संबंधित ट्रेड वर्कर्स

7. अकौंंटिंग, बुककीपिंग आणि पे रोल क्लर्क

8. स्टॉक कीपिंग आणि मटेरियल रेकॉर्डिंग क्लर्क

9. वाहतूक परिचर आणि कंडक्टर

10. घरोघरी जाऊन विक्री करणारे सेल्समन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news