Ahmedabad Air India Crash | अहमदाबाद विमान दुर्घटनेत 'पाप' झाकलं गेलं? पुरावे दडपल्याचा अमेरिकन संस्थेचा खळबळजनक दावा

Ahmedabad Air India Crash | अमेरिकन संस्थेचा दावा; आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी
Ahmedabad plane crash
Ahmedabad plane crash | अहमदाबाद विमान दुर्घटनेत पुरावेच दडपल्याचा आक्षेप
Published on
Updated on

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

२०२५ जून मध्ये अहमदाबादजवळ घडलेल्या एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेच्या तपासावर नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अमेरिकेतील विमान सुरक्षा क्षेत्रातील संस्थेने या दुर्घटनेशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे तपास यंत्रणांपासून लपवली. दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता, असा आरोप केला आहे.

Ahmedabad plane crash
OTEC Hybrid Project | लक्षद्वीपमध्ये जगातील पहिला चमत्कार! समुद्राच्या लाटांपासून मिळणार वीज आणि शुद्ध पाणी

अमेरिकास्थित फाऊंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टीचे कार्यकारी संचालक एड पिअर्सन यांनी तपास अधिकाऱ्यांना आणि देखरेख संस्थांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये हा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, संस्थेला काही 'गोपनीय आणि सार्वजनिक न झालेली कागदपत्रे' मिळाली असून त्यातून दुर्घटनाग्रस्त विमानात यापूर्वी अनेक गंभीर विद्युत बिघाड झाले होते, असे दिसून येते. दुर्घटनाग्रस्त विमान हे बोईंग ७८७ड्रीमलाइनर प्रकारातील होते आणि त्याचा नोंदणी क्रमांक व्हीटी-एएनबी होती.

हे विमान १२ जून २०२५ रोजी कोसळले. पिअर्सन यांच्या म्हणण्यानुसार, या विमानात पूर्वी धूर व दुर्गंधी निर्माण होणे, वायरिंग जळणे, शॉर्टसर्किट, स्पार्किंग आणि अगदी विद्युत आगीसारखे गंभीर प्रकार घडले होते. त्यांच्या ई-मेलमध्ये नमूद केले. आहे की, विमानातील पी १०० पॉवर पॅनल नावाचा महत्त्वाचा विद्युत घटक अनेकदा बिघडला होता.

परिणामी, विमानाला अनेक वेळा ग्राऊंड करण्यात आले आणि हा पॅनल तीन वेळा बदलावा लागला. सुरक्षा संस्थेच्या आरोपानुसार, या समस्यांशी संबंधित कागदपत्रे दुर्घटनेपूर्वी आणि नंतरही एअर इंडिया आणि बोईंग यांच्या नियंत्रणात होती; मात्र ती तपासकर्त्यांना देण्यात आली नाहीत.

भारताच्या तपास ब्युरोने जुलै २०२५ मध्ये जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालातही या बाबींचा उल्लेख नसल्याचे पिअर्सन यांनी सांगितले. तसेच दुर्घटनेनंतर नऊ महिने उलटूनही कोणत्याही सुरक्षाविषयक शिफारशी जाहीर झाल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Ahmedabad plane crash
Kashmir Tourism 2026 | इराण-इस्रायल युद्धाचा काश्मीरला फटका! दल लेकमधील हाऊसबोट्स ओस, पर्यटकांची पाठ

त्यांच्या मते, या माहितीच्या अभावामुळे पायलटांच्या चुकीलाच जबाबदार ठरविण्याची कथा अधिक बळकट झाली आहे. या संस्थेने असा दावा केला आहे की, पायलट त्रुटीऐवजी विमानातील संभाव्य तांत्रिक दोषही दुर्घटनेचे कारण असू शकतात.

अमेरिकेच्या सिनेटलाही पाठवला ई-मेल

पिअर्सन यांनी अमेरिकेच्या सिनेट न्याय समितीलाही ई-मेल पाठवून बोईंगच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या एका अधिकाऱ्याने या कागदपत्रांची प्राप्ती झाल्याची पुष्टी केली असून त्यांचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले आहे. २६० मृतांच्या कुटुंबीयांसाठी आणि विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सत्य समोर येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पिअर्सन यांनी अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news