

Child Begging Racket: अहमादाबदच्या रस्त्यावर, ट्रॅफिक सिग्नल, मंदीर, मॉल्स आणि हॉस्पिटलबाहेर जी एखादुसरी लहान मुले भीक मागताना दिसतात त्याच्या मागे त्यांची हतबलता नसून ते एक मोठं ट्रॅफिकिंग नेटवर्क आहे. अहमदाबादच्या क्राईम ब्रांचने महानगरपालिकेच्या मदतीने शहर भिकारी मुक्त करण्याची मोहीम उघडली होती. अहमाबादमध्ये २०३० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेतली होती.
मात्र या मोहिमेदरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील सरपंच किंवा गावातील प्रमुख व्यक्ती या भीक मागणाऱ्या मुलांचे दलाल झाले आहेत. ते गावातील गरीब कुटुंबातील मुले भीक मागण्याच्या या धंद्यात भरती करून घेतात. त्यानंतर त्यांना गुजरातमध्ये भीक मागण्यासाठी पाठवलं जातं.
पोलिसांनी या रॅकेटद्वारे शहरात २७६ मुलांची तस्करी करण्यात आल्याचे शोधले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या मुलांना आता सरकारी शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तसेच त्यांना जेवण आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानंतर आथा ज्यांनी या मुलांचे शोषण केले त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितलं.
अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'ही मुलं आंतरराज्जीय टोळाचा एक भाग आहे. यातील सर्व मुले अशीच भीग मागत नाहीयेत. यातील अनेक मुले ही अत्यंत गरीब घरातून येतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनीच मोठ्या शहरात इथं भीक मागायला पाठवलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटची सुरूवात ही गावतून होते. तिथं टोळी चालवणारे गावाच्या सरपंचांना संपर्क करतात आणि अत्यंत गरीब घरातील मुलांचा शोध घेतात. अधिकारी म्हणाले की, 'गुजरातमधील भिकाऱ्यांची टोळी चालवणारे राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुलांची भरती करण्यासाठी सरपंचांना पैसे देतात. सरपंच त्यातील काही पैसे मुलांच्या कुटुंबाला देतात. काही रक्कम ते आपल्यासाठी ठेवून घेतात. एवढंच नाही तर त्या मुलांच्या दिवसाच्या भीक मागून मिळालेल्या पैशातील २० टक्के रक्कम देखील या सरपंचांना द्यावी लागते.
ही टोळी या मुलांना अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी भीक मागण्यासाठी पाठवतात. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, 'धार्मिक स्थळे हा सर्वाधिक कमाई करण्याचा स्पॉट असतो. त्यानंतर ट्रॅफिक जंक्शन, रूग्णालये आणि शॉपिंग मॉल या ठिकाणांचा देखील समावेश असतो. मुलं तिथं अशीच पाठवली जात नाहीत. प्रत्येक ठिकाण हे जास्तीजास्त कमाई कशी मिळवता येईल या दृष्टीकोणातून निवडलं जातं.
अहमदाबाद क्राईम ब्रांचने सांगितलं की त्यांनी ज्या ठिकाणावरून ही मुलं येतात त्या गावांचा शोध आम्ही घेतला आहे. अधिकारी म्हणाले, 'आम्ही या टोळीत आपली मुले पाठवणाऱ्या पालकांना आणि सरपंचांना शोधलं आहे. आम्ही यांच्यावर चाईल्ड ट्रॅफिकिंग कायद्याअंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीकोणातून चाचपणी करत आहोत.