नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
देशातील ५९ जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ६ अग्निशमन जवानांचा समावेश आहे. शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीं पदक” तर पाच जवानांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक” जाहीर झाले आहे.
देशातील १४ कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘‘नागरी संरक्षण पदक’ ३ जणांना आणि उल्लेखनीय सेवेसाठी ‘ ‘नागरी संरक्षण पदक’ ११ जणांना जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ४ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर झाले आहेत.
राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ प्राप्त अधिका-यांची नावे-
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अग्निसेवा पदक - संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- अग्नि सेवा पदक
-किशोर ज्ञानदेव घाडीगावकर, विभागीय अग्निशमन अधिकारी,
-अनंत भिवाजी धोत्रे, उप अधिकारी,
-मोहन वासुदेव तोस्कर, आघाडीचे फायरमन,
-मुकेश केशव काटे, फायरमन
-किरण रजनीकांत हत्याल, अग्निशमन अधिकारी
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम), नागरी संरक्षण पदक-
अशोक बोवाजी ओलंबा, हवालदार
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- )- नागरी संरक्षण पदक
नितीन भालचंद्र वयचल, शिवाजी पांडुरंग जाधव, दीपक सूर्याजी सावंत, जनार्दन गोविंद वाघ