

Tesla showroom Delhi
नवी दिल्ली : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्ला (Tesla) लवकरच भारतातील दुसरा शोरूम सुरु करत आहे. मुंबईतील पहिल्या शोरूमनंतर, कंपनी दिल्लीतील दुसरे शोरूम 11 ऑगस्ट 2025 रोजी औपचारिकपणे उद्घाटन करणार आहे.
टेस्लाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (माजी ट्विटर) वर ही माहिती दिली असून, “Arriving in Delhi – stay tuned” असा संदेश देत दिल्लीतील उपस्थिती जाहीर केली आहे.
टेस्लाने भारतातील आपले पहिले शोरूम 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये सुरु केला होता. त्यानंतर काही आठवड्यांतच कंपनीने पहिलं चार्जिंग स्टेशन सुद्धा बीकेसीमध्ये कार्यान्वित केलं आहे.
टेस्लाने भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन – Tesla Model Y – लाँच केले आहे. ही एक मिडसाईज SUV असून सध्या भारतात फक्त हेच मॉडेल उपलब्ध आहे. Model Y चे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत:
रिअर-व्हील ड्राईव्ह (RWD) – किंमत: 60 लाख रुपये
लाँग रेंज रिअर-व्हील ड्राईव्ह (LR RWD) – किंमत: 68 लाख रुपये
फुल सेल्फ ड्रायविंग (FSD) पर्याय देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, ज्याची अतिरिक्त किंमत 6 लाख रुपये आहे.
LR RWD मॉडेलची रेंज: तब्बल 622 किमी
0 ते 100 किमी/तास वेग: फक्त 5.6 सेकंदात
15 मिनिटांच्या सुपरचार्जिंगमध्ये: 267 किमी रेंज
फर्स्ट रो सीट्स: हिटिंग, व्हेंटिलेशन आणि पॉवर रिक्लाइन फंक्शनसह
सेकंड रो: हिटिंग आणि पॉवर टू-वे फोल्डिंग सुविधा
8 बाह्य कॅमेरे, नवीन फ्रंट फेसिंग कॅमेरासह
हँड्स-फ्री बूट ओपनिंग, फक्त वापरकर्त्याच्या जवळ आल्यावर उघडणारा ट्रंक
Model Y सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. यातील Stealth Grey हा रंग एकमेव आहे जो कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतो. उर्वरित रंग – पर्ल व्हाईट मल्टी कोट, डायमंड ब्लॅक, अल्ट्रा रेड, क्विक सिल्व्हर आणि ग्लेशयर ब्लू यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
इंटीरियरमध्ये ब्लॅक आणि व्हाईट थीमचे पर्याय असून पाच आसनांची रचना (five-seat configuration) देण्यात आली आहे.
सध्या टेस्ला Model Y चे वितरण व नोंदणी केवळ मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम या तीन शहरांमध्येच उपलब्ध आहे. यामुळे टेस्लाच्या उपस्थितीला सध्या प्रादेशिक मर्यादा आहेत, मात्र भविष्यात ही विस्तारली जाण्याची शक्यता आहे.
भारतासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टेस्लाची एन्ट्री ही मोठी घडामोड मानली जाते. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत सरकारने घेतलेली पुढाकार, टेस्लासारख्या जागतिक ब्रँड्ससाठी अनुकूल ठरत आहे.
Model Y ची दमदार रेंज, प्रगत तंत्रज्ञान, व आकर्षक डिझाइनमुळे भारतीय ग्राहकांसाठी ही एक महत्त्वाची निवड ठरू शकते.