Abhijit Dipke Controversy: सोनम वांगचुक यांना उपोषणाचा अनुभव... आपण आपला जीव का धोक्यात घालावा; अभिजीत दिपकेंचे अजब वक्तव्य

Abhijit Dipke Controversy
Abhijit Dipke Controversypudhari
Published on
Updated on

Abhijit Dipke Controversy: नीट पेपर लीग प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी होत आहे. यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंजरवर आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी देखील उपोषण सुरू केलं आहे. गेल्या ९ दिवसांपासून सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत काही विद्यार्थ्यांनी देखील उपोषण केलं आहे. यांनी हे उपोषण मागे घेण्यासाठी सतत दबाव आणला जात आहे.

Abhijit Dipke Controversy
Campus To Career: बारामतीत ‘कॅम्पस टू करिअर’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एक अजब वक्तव्य करून चर्चेला तोंड फोडलं आहे. अभिजीत यांनी या विद्यार्थ्यांना ही लढाई खूप मोठी चालणार आहे. त्यांनी उपोषण करून तुमचा जीव का धोक्यात घालता असा प्रश्न करत उपोषण सोडण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोनम वांचुक यांना उपोषणाचा अनुभव आहे त्यामुळे त्यांना उपोषण करू द्यावे असे देखील अजब वक्तव्य केलं आहे.

सोनम वांगचुक हे सीजेपीच्या मंचावर गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे वजन झपाट्याने घटत आहे. सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचा बोलबाला असला तरी त्यांचे संस्थापक अभिजीत दिपके रस्त्यावरच्या लढाईत अजूनपर्यंत तरी फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत.

Abhijit Dipke Controversy
Pudhari Campus to Career : पुण्यातील नामवंत तज्ज्ञांचे आज संभाजीनगरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

त्यातच आचा काही समर्थकांसह जंतर मंतरवर सतत प्रदर्शन करणाऱ्या दिपके यांच्या या ताज्या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

एका युट्यूब चॅनलला बोलताना दिपके म्हणाले की, 'मी लोकांना सतत सांगत आहे. सर्व लोकांना मी तुम्ही उपोषण मागे घ्या. तुम्ही उपोषण करू नका असे आवाहन केलं. जर सर्व लोक उपोषण करू लागले तर सरकारला तर काय याची काळजी नाही. सरकारला काळजी असती तर २० मुलांचा मृत्यू होऊ दिला नसता. एका मृत्यूनंतरच पेपर लीगनंतर मंत्र्याचा राजीनामा आला असता. म्हणून मी सर्वांना उपोषण सोडण्यास सांगितलं आहे. सर्वांना फिट राहिलं पाहिजे जेणेकरून ही लढाई दीर्घ काळ देता येईल.

Abhijit Dipke Controversy
Pudhari Campus To Career: ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’: श्रीरामपूर व अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन

अभिजीत पुढे म्हणाले की, सोनम वांगचुक यांना उपोषणाचा अनुभव आहे. ते स्वतःला सांभाळू शकतात. या मुलांच्या आरोग्याबाबत मला थोडी चिंता आहे. त्यामुळं मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की उपोषण करू नका. आपला प्रोटेस्ट हा खूप काळ चालणार आहे त्यामुळं आपण आपला जीव का धोक्यात घालता? सोनम सर मोठं काम करत आहेत. मात्र त्यांच्यासाठी बाकीच्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्यासाठी आम्हाला तिथं असणं गरजेचं आहे. जर सर्व लोक उपोषणावर बसले तर प्रोटेस्ट मॅनेज कोण करणार?'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news