Pudhari Campus to Career : पुण्यातील नामवंत तज्ज्ञांचे आज संभाजीनगरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

'पुढारी कॅम्पस २ करिअर' उपक्रमाद्वारे बारावीनंतरच्या प्रवेशाचा राजमार्ग होणार खुला
Pudhari Campus to Career
Pudhari Campus to Careerpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक टप्प्यात इयत्ता १२ वी पास विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावे किंवा करिअरच्या नव्या वाटा व सुवर्णसंधी उपलब्ध आहेत, याबाबत 'पुढारी' माध्यम समूहातर्फे 'पुढारी कॅम्पस २ करिअर' हा विशेष उपक्रम होणार आहे. विद्यार्थ्यांना पुणे येथील नामवंत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

आज शनिवारी दि. २७ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील भानुदास चव्हाण सभागृह, रेल्वेस्टेशन रोड न्यू उस्मानपुरा कोकणवाडी येथे सकाळी १०.३० ते १ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, यावेळी गुणवंत विलायचासन देखील करण्यात येणार आहे.

Pudhari Campus to Career
Pudhari Campus to Career Seminar: रोबोटिक्‍स्‌ अन्‌ डिजिटल तंज्ञत्रानात करिअरची संधी

या सेमीनारमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन तसेच इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी लागणारी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल किंवा करिअरच्या नव्या वाटा आणि सुवर्ण संधी निवडण्याची माहिती मिळणार आहे.

करिअरसाठी योग्य मार्गदर्शन हा महत्त्वाचा भाग असून, विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, शैक्षणिक पार्श्वभूमी व भविष्यातील संधी, यांचा विचार करून वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे. बारामती शहर व परिसरातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

विद्यार्थी व पालकांचे कॅपराउंड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात होणार शंकानिरसन...

अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी पदवीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे राबवली जात आहे. नुकतेच एमएचटी सीईटीच्या पहिल्या टप्प्यातील पीसीबी व पीसीएम दोन्ही ग्रुपचे निकाल लागले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सीईटीचे निकालही लवकरच लागतील. त्याआधारे प्रवेश प्रक्रियेसाठी सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी कॅपराउंडमधील सहभाग, ऑप्शन फॉर्म भरणे, अलॉटमेंट, फ्लोट व फ्रीझ करणे आदी प्रवेश प्रक्रियेची माहिती, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, याबाबतच्या शंकांचे निरसन 'पुढारी कॅम्पस २ करिअर' या सेमीनारमध्ये पुणे येथील नामवंत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाणे सहज व सुलभ होणार आहे.

काय आहे 'पुढारी कॅम्पस २ करिअर'

  • बारावीनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन करिअर

  • निवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन

  • खासगी, डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची माहिती

  • सरकार व खासगी शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती

  • शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

  • केव्हा : शनिवार, २७ जून २०२६

  • कुठे : भानुदास चव्हाण सभागृह, रेल्वेस्टेशन रोड, न्यू उस्मानपुरा, कोकणवाडी, छत्रपती संभाजीनगर

  • वेळ: सकाळी १०.३० ते दुपारी १

Pudhari Campus to Career
Campus To Career: बारामतीत ‘कॅम्पस टू करिअर’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या क्षमता आणि तंत्रज्ञानतील बदल ओळखून योग्य क्षेत्राची निवड करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच योग्य शिक्षण संस्थेची निवडही तितकीच महत्वाची. "योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टीकोन विद्यार्थ्यांना यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जातो.

प्रा. अमोल बडे नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी

नव्या जगात आणि तंत्रज्ञानाच्या युगात तुमची व्यक्तिगत सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम राबवले जात आहेत. सायबर, डिजिटल तंत्रज्ञान, फॉरेन्सिक सायन्स आदींमधील करिअरविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

मुकेश अगरवाल, प्रवेश विभागप्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ

सध्या सर्वत्र एआयचा बोलबाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय'च्या क्षेत्रात करिअरच्या संधी काय असतील, आयटी कंपन्यांमध्ये इंटर्नशिप कशी मिळवायची, उद्योगधंद्यांमधील ४.० आणि ५.० यांचे एकत्रीकरण होत असताना कशा प्रकारचे मनुष्यबळ आवश्यक असणार आहे, या भविष्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे.

अजित गटे, अध्यक्ष, डिजीटेक रोबोटिक्स

logo
Pudhari News
pudhari.news