Abhijit Deepke released on bail : CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

शांतता राखण्याबाबतच्या बंधपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर होणार सुटका
अभिजित दीपके
अभिजित दीपकेPudhari
Published on: 
Updated on: 

CJP Founder Abhijit Deepke released on bail

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांना काही अटींच्या अधीन राहून जामीन मंजूर करण्यात आला आहे. शांतता राखण्याबाबतच्या बंधपत्रावर (पीस बाँड) स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका केली जाईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

तिरंगा मार्च दरम्‍यान दिपकेंना घेतले होते ताब्‍यात

नवी दिल्‍लीतील कनॉट प्लेस येथे तिरंगा मार्च निदर्शन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १६) दिल्‍ली पोलिसांनी ताब्‍यात घेतले होते. आज दुपारी त्‍यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्‍यात आले.

शांतताभंग प्रकरणी दीपकेंना झाली होती अटक

दिल्‍ली पोलिसांनी सांगितले की, 'दिल्ली पोलीस कायदा' (Delhi Police Act) च्या कलम ६५ अंतर्गत अभिजीत दीपके यांना ताब्यात घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्‍यात आली. यानंतर 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १२६ आणि १७० अन्वये शांतता भंग केल्याप्रकरणी त्‍यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आज त्‍यांना त्याला 'विशेष कार्यकारी दंडाधिकारी' (Special Executive Magistrate - SEM) यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला अटींसह जामीन मंजूर करण्यात आला.

अभिजित दीपके
Abhijit Deepke : ‘मी गावी निघालोय... " : 'CJP'च्‍या पत्रकार परिषदेआधीच अभिजित दीपके मूळ गावी रवाना

यापूर्वीही दीपकेंना घेण्‍यात आले होते ताब्‍यात

या घटनेच्या आधी, १० ऑक्टोबर रोजी जेव्हा दीपकेला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते, तेव्हाही त्याच्याविरुद्ध शांतता भंग केल्याप्रकरणी एक स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी, त्याला एक वर्षाच्या कालावधीसाठी शांतता राखण्याचे आश्वासन देणाऱ्या बंधपत्रावर (bond) स्वाक्षरी करायला लावली होती. दीपकेसोबतच दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा हिलाही ताब्यात घेतले होते, मात्र नंतर तिची सुटका करण्यात आली होती.

अभिजित दीपके
Abhijit Deepke statement : "आम्हाला सर्वांना अटक करा..." : अभिजीत दीपकेंचे थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंता यांना आव्हान

अटकेची कारवाई बेकायदेशीर : नेहा बोरा

सुटकेनंतर माध्‍यमांशी बोलताना नेहा बोरा म्‍हणाल्‍या की, "मला मंडी हाऊस येथून ताब्यात घेण्यात आले आणि पहाटे ५:०० वाजेपर्यंत (पोलीस ठाण्यात) ठेवण्यात आले. पोलीस अशा प्रकारची बेकायदेशीर धरपकड का करत आहात? देशात हे दीर्घकाळापासून सुरू आहे. या आंदोलनामुळे अशा प्रकारच्या अटकेचा प्रकार समोर आला आहे. या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्याचा आणि नियमांनुसार काम करण्याचा दावा करतात, परंतु प्रत्यक्षात तसे काहीही घडत नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news