Abhijeet Dipke Detained: पोलिसांची मोठी कारवाई; तिरंगा मार्चच्या १० मिनिटे आधीच अभिजीत दिपके ताब्यात, दिल्लीत नेमकं काय घडलं?

Abhijeet Dipke Detained: दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये CJP च्या ‘लहरा दो तिरंगा’ मार्चपूर्वी अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Abhijeet Dipke Detained
Abhijeet Dipke DetainedPudhari
Published on: 
Updated on: 

Abhijeet Dipke Detained: दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये CJP च्या ‘लहरा दो तिरंगा’ मार्चला सुरुवात होण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मार्चपूर्वीच परिसरात खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांचे एक पथक यापूर्वी अभिजीत दिपके यांना नोटीस देण्यासाठी पोहोचले होते. कनॉट प्लेस परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू असल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. तसेच, तिरंगा मार्च काढण्यासाठी नवी दिल्ली महानगरपालिकेची (NDMC) परवानगी घेतलेली नसल्याचेही पोलिसांनी म्हटले होते.

मार्च काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता

पोलिसांनी दिलेल्या नोटिशीनुसार, कनॉट प्लेस परिसरात जाऊन मार्चमध्ये सहभागी झाल्यास लागू निर्बंधांचे उल्लंघन मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर मार्च सुरू होण्याच्या दहा मिनिटे आधीच अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दिल्ली पोलिसांचे तिरंग्याच्या सन्मानाचे आवाहन

या घडामोडींदरम्यान दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. भारतीय राष्ट्रध्वजाला सर्वोच्च आदर मिळायला हवा आणि प्रत्येकाच्या वागण्यातून देशभक्ती दिसली पाहिजे, असे पोलिसांनी म्हटले.

‘तिरंग्याचा सन्मान करा आणि देशाचा गौरव कायम राखा,’ असा संदेशही दिल्ली पोलिसांनी दिला. ‘लहरा दो तिरंगा’ मार्चपूर्वी झालेली ही कारवाई आणि पोलिसांनी दिलेला इशारा यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news