Abhijeet Dipke statement| शारीरिक हल्ले हे भ्याडपणाचे लक्षण, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे! : अभिजित दिपके

जयपूर येथी हल्ल्यानंतर दिपके यांची प्रतिक्रीया, कितीही हल्ले होऊ देत शांततेचा मार्ग सोडणार नाही
Abhijeet Dipke attack
Abhijeet Dipke statement
Published on
Updated on

Abhijeet Dipke attack शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहेत.आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज उठवणे सुरूच ठेवू. मी गांधी आणि आंबेडकर यांचा अनुयायी आहे आणि शांतता व प्रेमाच्या जोरावर हा लढा लढत राहीन. असे मत कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एक्स पोस्टवर व्यक्त केले आहे. जयपूर येथे आंदोलनादरम्यान दिपके यांना मारहाण झाली होती, यानंतर त्‍यांनी पोस्ट करत आपले मत मांडले आहे. तसेच त्‍यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे! याचा पुनरोच्चार केला आहे.

जयपूर येथे 'कॉकरोच जनता पार्टी'तर्फे नीट परिक्षेतील घोटाळा, बेरोजगारी याबाबात शहीद स्मारकावर आंदोलन केल जात होत तेव्हा ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत समर्थकांच्या खांद्यावर असलेल्या दिपके यांना एक ते दोन व्यक्ति मारहाण करताना दिसत आहेत. त्‍यांनतर त्‍यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

आमचा लढा सुरुच राहील

यानंतर दिपके यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत आपला लढा सुरुच राहिल असा निर्धार व्यक्त केला आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळयामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्‍महत्‍या केल्या आहेत त्‍यासाठी शिक्षण मंत्री धर्मंद्र प्रधान यांनी राजिनामा दिलाच पाहिजे. ही आमची ठाम मागणी आहे. शांततेच्या मार्गाने आमचा लढा सुरुच राहिल

दहा वेळा हल्ला केला तरी मागे हटणार नाही

आमचा लढा न्याय हक्का साठी आहे. तुम्ही कितीही वेळा आम्हाला थप्पड मारा किंवा हल्ले करा आमचा लढा आम्ही सुरुच ठेवणार आहोत. आमचे शांततेच्या मार्गाने पूढे निघाले आहे त्‍याला चिरडण्याचा प्रयत्‍न होत आहे. त्‍यामुळे कोणीही डिस्ट्रक होऊ नये. ते कितीही हात उचलू देत आमच्याकडून हात उचलला जाणार नाही. शांततेच्या मार्गाने आम्ही पुढे जाणार आहोत. व आम्ही बोलत राहणार धर्मेद्र प्रधान तुम्ही राजिनामा दिलाच पाहिजे. याचा दिपके यांनी पुनूरोच्चार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news