Raghav Chadha | राघव चड्ढा यांना 'आप'ने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले

Raghav Chadha |आपच्‍या कोट्यातून सभागृहात बोलण्‍यास वेळ न देण्‍याचीही केली विनंती
AAP has removed Raghav Chadha as Deputy Leader in the Rajya Sabha
राघव चड्ढा.Pudhari Photo.
Published on
Updated on

Raghav Chadha removed as Deputy Leader Rajya Sabha

नवी दिल्‍ली : आम आदमी पक्षाने (AAP) राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून राघव चड्ढा यांना उच्च सभागृहातील पक्षाच्या उपनेतापदावरून हटवण्याची विनंती केली आहे. तसेच, AAP च्या कोट्यातून त्यांना बोलण्याचा वेळ देऊ नये, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.याशिवाय, AAP ने राज्यसभा सचिवालयाला अशोक मित्तल यांची उच्च सभागृहातील पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीतूनही चड्ढा यांना वगळले

मागाल आठवड्यात, आगामी पाच राज्‍यांमध्‍ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी आप ने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही चड्ढा यांना वगळले होते.

अशोक मित्तल होणार पक्षाचे राज्‍यसभेतील नवीन उपनेते

'पीटीआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, 'आप'ने (AAP) राज्‍यसभेसाठी अशोक मित्तल यांचे नाव नवीन उपनेते म्हणून प्रस्तावित केले आहे. या नियुक्तीला लवकरात लवकर औपचारिक स्वरूप देण्याची विनंती सचिवालयाकडे केली आहे. सध्या आपचे राज्यसभेत १० सदस्य आहेत. यामध्ये पंजाबमधील सात आणि दिल्लीतील तीन सदस्यांचा समावेश आहे.

AAP has removed Raghav Chadha as Deputy Leader in the Rajya Sabha
Assembly Elections Focus | वेध पाच राज्यांच्या निवडणुकांचा

राघव चढ्ढा 'आप'च्‍या स्‍थापनेपासूनच पक्षासोबत

पंजाबमधून राज्यसभेचे खासदार असलेले राघव चढ्ढा हे 'आम आदमी पक्षा'च्या (AAP) स्थापनेपासूनच या पक्षाशी जोडलेले आहेत; २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत 'दिल्ली लोकपाल विधेयका'वर काम करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

AAP has removed Raghav Chadha as Deputy Leader in the Rajya Sabha
Raghav Chadha: मोबाईल डेटा न वापरता गायब होतोय; टेलिकॉम कंपन्यांचा स्कॅम? राघव चढ्ढांनी संसदेत उपस्थित केला मुद्दा

पक्षाचे सर्वात तरुण कोषाध्यक्ष

राघव चढ्ढा यांचा आम आदमी पार्टीतील प्रगती ही लक्षणीय होती. ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते बनले आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील 'आप'च्या विजयानंतर, पक्षाचे सर्वात तरुण कोषाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली.

AAP has removed Raghav Chadha as Deputy Leader in the Rajya Sabha
Ramayana | ‘आता अफवा थांबवा!’ राघव जुयालच्या रिप्लेसमेंटवर विक्रांत मेस्सीने अखेर सोडले मौन

लोकसभा निवडणुकीत पराभव, विधानसभा निवडणुकीत विजय

राघव चढ्ढा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना रमेश बिधुरी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला; त्यानंतर २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नगर मतदारसंघातून ते विजयी झाले. यानंतर 'दिल्ली जल मंडळा'चे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

AAP has removed Raghav Chadha as Deputy Leader in the Rajya Sabha
West Bengal Election 2026 | गेल्या वेळेस ८ टप्प्यांत झालेली पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक यंदा फक्त २ टप्प्यांतच का?

राज्‍यसभेचे पक्षाचे सर्वात तरुण खासदार

२०२२ मध्ये, वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी राघव चढ्ढा हे राज्यसभेचे सर्वात तरुण खासदार बनले. तेव्हापासून, मनीष सिसोदिया आणि भगवंत मान यांच्यासारख्या नेत्यांच्या सोबतीने काम करत, त्यांनी 'आप'च्या संसदीय आणि संघटनात्मक कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०२३ मध्ये, 'आप'ने संजय सिंह यांच्या जागी राघव चढ्ढा यांची राज्यसभेतील पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news