विनेश फोगाटच्या विरोधात ‘आप’कडून महिला कुस्तीपटूला उमेदवारी

विधानसभेच्या आखाड्यात दोन कुस्तीपटू समोरा-समोर
Hariyana Vidhansabha Election
हरियाना विधानसभेसाठी दोन कुस्तीपटू आखाड्यातPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बुधवारी चौथी यादी जाहीर केली. ‘आप’ने काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट यांच्या विरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे माजी कुस्तीपटू कविता दलाल यांना उमेदवारी देण्यात आली.

Hariyana Vidhansabha Election
विनेश फोगाटने दाखल केला उमेदवारी अर्ज

आम आदमी पक्षाच्या चौथ्या यादीमध्ये २१ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याविरोधात लाडवा मतदारसंघातून जोगा सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आम आदमी पक्षाने आतापर्यंत ६२ उमेदवारांची घोषणा केली आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत ‘आप’सोबत आघाडी करण्याची इच्छा काँग्रेस नेत्यांना आणखीही आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर या आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंदर सिंह हुड्डा यांना आम आदमी पक्षासोबत आघाडी करायची नाही. तर इतर काही काँग्रेस नेत्यांना या आघाडीत रस आहे. त्यामुळे अद्यापही आघाडीबाबत काँग्रेसने अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Hariyana Vidhansabha Election
विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्या माध्यमातून काँग्रेसचे लक्ष्य काय?

हरियाणा निवडणुकीसाठी ‘आप’ ४०-स्टार प्रचारक

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, मनीष सिसोदिया, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news