विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्या माध्यमातून काँग्रेसचे लक्ष्य काय?

Congress | विविध मुद्द्यांवरून काँग्रेस भाजपला घेरण्याच्या प्रयत्नात
Vinesh Phogat, Bajrang Punia in politics
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.(Photo- PTI)
Published on
Updated on
प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा प्रवेश अनेक अर्थांनी काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये काहीशा वजनामुळे विनेश फोगाटला अपात्र करण्यात आले होते. त्यापूर्वी विविध कारणांनी विनेश फोगाट, बजरंग पुनिया पैलवान रस्त्यावर उतरले होते. या संपूर्ण काळात काँग्रेस पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. (Congress)

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया राजकारणाच्या आखाड्यात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएने पुन्हा एकदा सत्ता मिळवली असली तरी विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडी मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने भाजप संविधान बदलणार यासह केंद्र सरकारच्या अग्नीवीर योजनेवरून, खेळाडूंसाठी तयार केलेल्या धोरणांवरून तसेच महिला वर्गाच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. याचे नुकसान एनडीएला तर फायदा इंडिया आघाडीला झाल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडीनंतर देशात महाराष्ट्रसह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर अशा चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. या पार्श्वभुमीवर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. (Congress)

काँग्रेसचा विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

काँग्रेसने विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यापैकी विनेश फोगाटला विधानसभेची उमेदवारी दिली. तर बजरंग पुनिया यांना किसान काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. या दोन्ही कुस्तीपटूंच्या माध्यमातून काँग्रेस विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. देशात खेळाडूंना सापत्न वागणूक मिळते, हवे तसे प्रोत्साहन दिले जात नाही, त्यातल्या त्यात महिला खेळाडूंचे गेल्या काही काळातील प्रश्न, त्यांना देण्यात आलेली वागणूक या सर्व मुद्यांना काँग्रेस हरियाणासह महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच हरियाणा मधील शेतकऱ्यांचेही प्रश्न आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या भागातून मोठ्या प्रमाणात तरुण सैन्यात भरती होतात.

दोन्ही कुस्तीपटूंचा काँग्रेस प्रवेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा

गेल्या काही दिवसात देशभरात विविध ठिकाणी महिला सुरक्षेविषयक निर्माण झालेले प्रश्न असे सगळे मुद्दे घेवून शेतकरी, सैन्य भरती, खेळाडू, महिला सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवरून काँग्रेस भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी, सैन्य भरती, खेळाडू, महिला सुरक्षा या सर्व घटकांशी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा जवळचा संबंध आहे. स्वाभाविकच विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या माध्यमातून पक्ष या सर्व घटकांच्या आणखी जवळ जाईल आणि म्हणूनच या दोन्ही कुस्तीपटूंचा काँग्रेस प्रवेश हा काँग्रेस पक्षासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे.

Vinesh Phogat, Bajrang Punia in politics
हरियाणा विधानसभा निवडणूक : ‘काँग्रेस-आप’चे एकला चलो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news