Bengaluru News | पतीने पत्नीला भोसकले अन् फेसबुकवर अपलोड केला व्हिडिओ

बंगळूरमधील धक्कादायक घटना
 Crime News Bengaluru News
बंगळूरच्या चामराजपेठ येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बंगळूरच्या चामराजपेठ येथे एक धक्कादायक घडना घडली आहे. चामराजपेठ येथे शुक्रवारी एका ४० वर्षीय व्यक्तीने सासूच्या घरात घुसून त्याच्या पत्नीची हत्या केली. (Bengaluru News) या घटनेनंतर संशयित आरोपीने त्याने केलेल्या कृत्याचा आणि सासूला धमकावण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याने व्हिडिओतून सासू आणि इतरांना त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडिओ त्याने फेसबुकवर अपलोड केला. त्यानंतर संशयित व्यक्ती पसार झाला.

पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. तबरेज पाशा असे त्याचे नाव असून तो दक्षिण बंगळूरमधील सिद्धापुरा येथील रहिवासी आहे. पाशा याला काही वर्षांपूर्वी दरोड्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची पत्नी सय्यदा फजिल फातिमा ही दोन मुलांसह तिच्या आईसोबत एमडी ब्लॉक येथे राहत होती. फातिमा चामराजपेठेतील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. तिने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला असून हा खटला सुरू होता.

 Crime News Bengaluru News
Virar Hit and Run | विरारमध्ये हिट अँड रन, फॉर्च्यूनरने प्राध्यापिकेला चिरडले

हत्येच्या घटनेचा आणि धमकीचा व्हिडिओ केला रेकॉर्ड

बेरोजगार असलेल्या तबरेजने फातिमाला त्याच्या घरी परत येण्यासाठी तिचे अनेकवेळा मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने नकार दिला. पण शुक्रवारी सकाळी फातिमा घरात एकटी असताना तो घरात आला. त्यावेळी मुले शाळेत गेली होती. तर तिची तिची आई बाजारात गेली होती. त्याने रागाच्या भरात तिला वारंवार भोसकले आणि त्याने नंतर पळून जाण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, एका पोलिसांनी सांगितले. (Crime News)

पोलिसांनी अधिक मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाशा त्याच्या सासरच्या घरी आला. मुले शाळेत जाण्यापूर्वी तो त्यांच्याशी बोलला. नंतर त्याने पत्नीला पुन्हा एकत्र राहू यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण तिने स्पष्ट नकार दिल्याने त्याने त्याच्या खिशातून चाकू काढला आणि तिच्यावर अनेकवेळा वार केले. त्यानंतर त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला.

 Crime News Bengaluru News
Yashshri Shinde murder case | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत यशश्रीला बोलावलं, तपासात धक्कादायक खुलासे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news