Virar Hit and Run | विरारमध्ये हिट अँड रन, फॉर्च्यूनरने प्राध्यापिकेला चिरडले

विरारच्या गोकुळ आत्मजा कासाट टाऊनशिप येथील घटना
Virar Hit and Run
file photoFile Photo
Published on
Updated on

खानिवडे : विरारच्या विवा कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका आत्मजा कासाट (वय ४५) यांचा मद्यधुंद चालकाने बेदरकारपणे चालवलेल्या फॉर्च्यूनरच्या ठोकरीत मृत्यू झाला. वसई-विरारच्या गोकुळ आत्मजा कासाट टाऊनशिप येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. फॉर्च्यूनर चालक शुभम प्रताप पाटील (२४) याला मद्यधुंद अवस्थेत जागरूक नागरिकांनी पकडले. या अपघातप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात शुभम पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (Virar Hit and Run)

तिघेही नशेत

फॉर्च्यूनर गाडीत शुभमसह त्याचा मित्र आणि अन्य दोन तरुणी होत्या. ते सर्व मद्याच्या नशेत होते. नवीन विवा महाविद्यालयाजवळ गाडीत ते मद्यपान करत होते, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. शुभम पाटील हा डोंगपाडा येथे राहणारा असून, व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांचा खाणीचा व्यवसाय आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news