Yashshri Shinde murder case | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत यशश्रीला बोलावलं, तपासात धक्कादायक खुलासे

फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रीची इच्छा होती
Yashshri Shinde murder case
यशश्रीच्या शरीराव दाऊदच्या नावाचे टॅटू आढळल्याने खळबळ उडाली आहे. file photo
Published on
Updated on

उरण : उरणची युवती यशश्री शिंदे हिच्या निघृण हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या जबाबातून गेल्या दोन दिवसात निरनिराळे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खाजगी फोटो होते. ते फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रीची इच्छा होती. मात्र आरोपीने तरुणीला तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानुसार भेटायला बोलावले आणि हत्या केली.

Summary

हत्येनंतर असा फरार झाला दाऊद

  • यशश्रीची हत्या केल्यानंतर आरोपीने उरणहून ट्रेनने पनवेल गाठले. त्याने मित्राला फोन करून काही पैसे मागितले, त्यानंतर त्याने पनवेल स्टेशनजवळील एटीएममधून एक हजार रुपये काढले.

  • कळंबोली येथून ट्रॅव्हल बसने कर्नाटकातील गुलबर्गा येथील शाहपूरला बस पकडली. शहापूरमध्ये त्याने मोबाइल बंद करून आजीच्या घरी सोडला. नंतर तो एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाऊ लागला.

  • शेवटी पाच दिवसांनी ३० जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांनी पहाटे त्याला पकडलं. पहाटे ५ वाजता त्याला शहापूरजवळील डोंगरावरून अटक करण्यात आले.

यशश्री शिंदे हत्याप्रकरणी रोज नवनवे खुलासे पुढे येत आहे. जोपर्यंत हत्या कोणत्या कारणासाठी केली हे उघड होत नाही तोपर्यंत विविध मार्गांनी दाऊदची चौकशी सुरूच ठेवली जाणार असल्याचे तपास अधिकारी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

फोटो फेसबुकवर टाकताच यशश्री भेटायला तयार

आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खाजगी फोटो होते. ते फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रीची इच्छा होती. मात्र आरोपीने तरुणीला तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. यानंतर २४ जुलै रोजी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ तो तरुणीला भेटला. यानंतर आरोपीने तिला २५ जुलैला सतत फोन करून भेटायला बोलवले. ती भेटायला तयार नव्हती, तेव्हा त्याने तो फोटो त्याच्या फेसबुकवर टाकला. फोटो पाहताच तिने पुन्हा भेटायला होकार दिला. आरोपीने पोलिसांना सांगितले की, भेटल्यावर यशश्रीने फेसबुकवरून फोटो डिलिट करण्यास सांगितले आणि त्याने फोटो डिलिट केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीनेही आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावून आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीने चाकूने यशश्रीची हत्या केली. आरोपी दाऊदने बंगळुरहून दोन चाकू आणले होते. त्यातील एक चाकू वापरून त्याने यशश्रीची हत्या केली.

यशश्रीच्या शरीराव दाऊदच्या नावाचे टॅटू

नव्या माहितीनुसार, यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे टॅटू दाऊद शेख याच्या नावाचे होते. मात्र हा टॅटू यशश्रीच्या संमतीने काढण्यात आला की यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. दाऊद शेखला अटक करून दोन दिवस उलटले आहेत. त्याच्या चौकशीत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचं दाऊदकडून सांगितलं जात आहे. हत्येच्या पाच दिवस आधी म्हणजेच २० जुलै रोजी पनवेल न्यायालयाने आरोपी दाऊदविरुद्ध एनवीडब्ल्यू जारी केला होता. २०१९ मध्ये दाखल झालेल्या खटल्याच्या तारखेला कोर्टात हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरुद्ध हा अजामिनपात्र गुन्हा) जारी करण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं होतं की, आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करणे बाकी आहे आणि हे प्रकरण जुने आहे. तरीही तो बराच काळ न्यायालयात येत नाही, त्यामुळे त्याच्याविरुद्ध एनबीडब्ल्यू जारी करण्यात यावा. याप्रकरणी पुढील तारीख १२ ऑगस्ट ठेवण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news