

a huge fire broke out at the shankha dwar of baba mahakaleshwar temple
उज्जैन : पुढारी ऑनलाईन
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उज्जैनच्या बाबा महाकालेश्वर मंदिर परिसरात आग लागली. यामुळे उपस्थित भाविकांमध्ये गोंधळ उडाला. शंखव्दाराजवळील ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाल्याने आग आगल्याचे समोर येत आहे. सुर्देवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
उज्जैन येथील जगप्रसिद्ध बाबा महाकालेश्चवर मंदिराच्या शंख व्दारावर आज (सोमवार) अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीचे लोळ आणि धूर हे जवळपास १ किलोमीटर दूरवरूनही दिसत होते. आगीच्या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्यावर ठेवण्यात आलेल्या बॅटऱ्यांमध्ये लागली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. महाकाल मंदिर समितीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाउन परिस्थितीची माहिती घेतली.
आग लागली त्यावेळी मंदिरात हजारो भक्त उपस्थित होते. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर तात्काळ दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली. यामुळे अर्धा ते एक तास भाविकांना दर्शनासाठी थांबावे लागले.
महाकाल लोक परिसरात महाकाल मंदिरात प्रवेशासाठी शंख व्दार आहे. या दरवाजाजवळील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटानंतर ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. काही वेळातच या आगीने भीषण रूप धारण केले. सर्वत्र काळा धूर पसरू लागला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दरवाजातून व्हीआयपी लोकांची एंट्री होते.
शंख व्दाराजवळील ट्रांन्सफॉर्मरजवळ स्फाेट झाला. यातून पडलेल्या ठिणगीने आग लागली. यावेळी मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीमुळे भक्तांची पळापळ झाली. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणली. विद्युत विभागाने तात्काळ विद्युत पुरवठाही खंडित केला. ट्रांन्सफॉर्मरमधील ऑईलमुळे ही आग भडकल्याचे बाेलले जात आहे. दरम्यान आता या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.