

Couple killed, 3 children feared dead in Kanpur building fire
कानपूर : पुढारी ऑनलाईन
चमनगंज क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या प्रेमनगर परिसरात काल (रविवार) रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास एका पाच मजली इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या तळघरात बुट बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात आग लागली. यामध्ये पाच लोकांचा जळून मृत्यू झाला.
या आगीने काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले. आगीचे मोठे लोळ पाहून या ठिकाणी लोकांची पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या ३५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्रभर या आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होते. या इमारतीत काही लोक अडकल्याच्या शक्यतेने रेस्क्यू ऑपरेशनही सुरू करण्यात आले.
रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या चप्पल व्यावसायीक दानिश, त्याची पत्नी आणि तीन मुलींना तसेच त्यांना शिकवायला आलेल्या शिक्षिका यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.
प्रेमनगरमध्ये दानिश यांची सहा मजली इमारत आहे. या इमारतीत त्यांचा भाउ कासिम आणि दानिश यांचे कुटुंबियच राहतात. तर तळघरात दानिश यांचा मिलेट्रीचे बुट बनवण्याचा कारखाना आहे. तर त्याच्यावर गोडाउन आहे.
या इमारतीच्या तळघरात तयार करण्यात आलेले बूट ठेवण्यात आले होते. रविवार असल्याने कारखाना बंद होता. रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. इमारतीत आग लागल्याचे समजल्यावर इमारतीतील कुटुंबिय जीव वाचवण्यासाठी पळू लागले.
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दोनशे मीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून जवळपासच्या इमारती मोकळ्या करण्यात आल्या.
रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. प्रशासनाचे कर्मचारीदेखील या ठिकाणी उपस्थित होते. मात्र एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या दुर्घटणेत पाच लोकांचा मृत्यू झाला.