J&K Kupwara Encounter | कुपवाडामध्ये चकमक, एक जवान शहीद, मेजर रँक अधिकाऱ्यासह ४ जखमी, एक दहशतवादी ठार

पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमकडून हल्ला
 Terrorist attack
जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल सेक्टरमध्ये शनिवारी चकमक उडाली.Representative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

जम्मू- काश्मीरच्या (Jammu and Kashmir) कुपवाडा जिल्ह्यातील (Kupwara encounter) मच्छल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत (J&K Kupwara Encounter) एका मेजर रँक अधिकाऱ्यासह ५ भारतीय लष्करी जवान जखमी झाले. पाचही जखमी जवानांना त्या ठिकाणाहून उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, जखमी जवानांपैकी एक शहीद झाला असल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या कारवाईदरम्यान एका पाकिस्तान दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी सकाळी नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या भागात अनेक दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे. येथील चकमकीत ४ जवान जखमी झाले असून एक शहीद झाला आहे.

पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमकडून हल्ला

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमने (बीएटी) हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला परतवून लावला. यादरम्यान एक जवान शहीद झाला, तर मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह ४ जण जखमी झाले. बॉर्डर ॲक्शन टीम्स (BATs) मध्ये पाकिस्तानी लष्कराचे कमांडो आणि दहशतवाद्यांचा सहभाग असतो. ते पूर्वी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीसाठी ओळखले जात होते.

 Terrorist attack
जम्मू-काश्मिर; कुपवाडमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार, एक जवान जखमी

कुपवाडामध्ये तीन दिवसांतील ही दुसरी चकमक

कुपवाडा येथील कामकरी भागातील तीन दिवसांतील ही दुसरी चकमक आहे. या भागातील संभाव्य दहशतवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली. या दरम्यान गोळीबार झाल्याने चकमक उडाली. एक शहीद आणि जखमी जवानांना घटनास्थळावरुन हलवण्यात आले आहे. कारण अद्यापही येथे चकमक सुरू आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय जवानांनी पाक बॉर्डर ॲक्शनचा हल्ला परतवून लावला

एएनआयने संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीमने (BAT) केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला परतवून लावला. पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीम टीममध्ये त्यांच्या एसएसजी कमांडोसह पाकिस्तानी लष्कराचे नियमित सैनिक असल्याचा संशय आहे; जे दहशतवादी संघटनांशी जवळून काम करतात.''

 Terrorist attack
दहशतवादी एक तर तुरुंगात राहतील किंवा नरकात जातील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news