राकेश टिकैत, “योगींना पंतप्रधान अन् मोदींना राष्ट्रपती होऊ द्या”

राकेश टिकैत, “योगींना पंतप्रधान अन् मोदींना राष्ट्रपती होऊ द्या”

पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल वर्षभर शेतकरी आंदोलन चिवटपणे टिकवून ठेवणारे नेते राकेश टिकैत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार? भाजपच्या विरोधात कोणत्या पक्षाचे समर्थन करणार?  हे दोन प्रश्न सध्या महत्वाचे झालेले आहेत. एका मुलाखतीत त्यांना सांगितलं आहे की, "जनता भाजपला मत देणार नाही. आता नरेंद्र मोदींना राष्ट्रपती आणि योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे", असा टाेलाही राकेश टिकैत यांनी लगावला.

"भाजपला सध्या जनतेच्या मतांची विजय मिळणार नाही. पण, यामध्ये गडबड नक्की होऊ शकते. त्यांना कोणी मतही देत नाहीत. हे लोक बेईमानी करणार. जे उमेदवार आहेत, त्यांनी आता सजग राहावं. ३-३ वकील तयार ठेवा. जेव्हा फाॅर्म भरायला जातील तेव्हा ते गडबड करतील आणि आपल्या पत्रिका रद्द करतील. ते गडबड गोंधळ करून विजय मिळविण्याचा प्रयत्न करतील", असे मत मांडून राकेश टिकैत यांनी भाजपवर निशाणा साधला.

ऊसाच्या किमतीच्या वाढीबद्दल योगी सरकार तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांकावर मायावती होत्या. दुसऱ्या क्रमांकावर अखिलेख होते. अशा पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर टिकैत म्हणाले की, "अहो, त्यांना पंतप्रधान होऊ द्या. राज्याच्या प्रश्नांमध्ये त्यांना कशाला अडकवून ठेवता. त्यांना पंतप्रधान होऊ द्या आणि नरेंद्र मोदींना राष्ट्रपती होऊ द्या", असेही त्यांनी माध्यमांना सांगितले.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news