गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणावर एसटी संघटना भडकल्या ! चूल बंद होत असल्याचा केला आरोप | पुढारी

गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणावर एसटी संघटना भडकल्या ! चूल बंद होत असल्याचा केला आरोप

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने राज्यातील सर्वसामान्यांची दररोज होरपळ होत आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी संघटना भडकल्या आहेत. त्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे चूल बंद होण्याची वेळ आल्याचा आरोप एसटी संघटनांनी केला आहे.

आज (ता.१०) राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब मंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीग्रुह येथे एसटी कृती समितीची बैठक झाली.

या बैठकीत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली नाही.(सुमारे ५५हजार कर्मचारी) त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हा! त्यांच्यावर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे परिवहन मंत्री यांनी सांगितले. त्यानुसार कृती समिती मधील संघटनानी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.

चर्चा सकारात्मक झाली. वेतनवाढीतील त्रुटी दूर करणार, विलीनीकरणाचा मुदा न्यायालयात आहे. समितीचा जो निर्णय येईल, तो राज्य सरकारला मान्य असेल, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नाही असेही आश्वासन अनिल परब यांनी म्हटले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button