capricorn वार्षिक राशिभविष्य 2022 मकर : सुसंधी लाभेल

today horoscope
today horoscope
Published on
Updated on

वार्षिक राशिभविष्य 2022

न्याय व अन्याय या बाबतीत तडजोड न करण्याची आपली वृत्ती आहे. कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिकबाबतीत विशेष जागरूक हे आपले वैशिष्ट्य आहे. शनीकडे संयम आहे, शिस्त आहे, सहनशीलता आहे. विवेक आहे, विचार आहे. व्यवहारचातुर्य आहे. समाजापासून दूर राहण्याची आपली प्रवृत्ती आहे. आपला एकांतवासाकडे अधिक कल आहे. आत्मसंयमन ही आपली शक्‍ती आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारे आत्मसंयमन व स्वयंशासन हे आपल्याकडे विशेषत्वाने असते. प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणे, विचारपूर्वक टाकणे, प्रत्येक विषयाचा साधकबाधक विचार करणे हे आपले वैशिष्ट्य असते. आपल्याकडे प्रामाणिकपणा आहे, न्यायीपणा आहे, कोणत्याही कार्याची, संस्थेची जबाबदारी उचलण्याची आपली मानसिक तयारी असते.

capricorn आरोग्य 

आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले आहे. सामान्यत: अजून साडेतीन वर्षे साडेसाती शिल्‍लक आहे. त्यामुळे साडेसातीचा परिणाम यावर्षी सर्व जीवनावर होणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. साडेसाती असली तरीसुद्धा आपण प्रत्येक काम गांभीर्याने व जबाबदारीने कराल. तुमचे मनोबल वाढणार आहे. सोशिकता वाढणार आहे. व्यवसायाच्या कामाचा ताण व दगदग जाणवेल. शनी आपल्या आरोग्याच्या स्थानातच म्हणजे प्रथमस्थानात आहे. हा शनी स्वत:च्याच राशीमध्ये आहे, त्यामुळे फार वाईट परिणाम करणार नाही. परंतु; आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्यांना मुळातच आरोग्यासंदर्भात अडचणी आहेत, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यासंदर्भात तक्रारी उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्‍ला घेणे आवश्यक आहे. योगा केल्याने मानसिक शांतता लाभेल. आपले मानसिक स्वास्थ्य कोणत्याही कारणाने डगमगणार नाही याची काळजी घ्यावी.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 28/04/2022 ते दि. 13/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 31/08/2022
दि. 25/09/2022 ते दि. 24/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 17/12/2022

सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे खालील कालखंडात मकर राशीच्या व्यक्‍तींनी विशेष काळजी घ्यावी.

दि. 14/01/2022 ते दि. 12/02/2022
दि. 27/02/2022 ते दि. 06/04/2022
दि. 15/10/2022 ते दि. 13/11/2022

capricorn : कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिकबाबतीत विशेष जागरूक हे वैशिष्ट्य असलेल्या मकर राशीचे वार्षिक राशिभविष्य 2022.
capricorn : कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिकबाबतीत विशेष जागरूक हे वैशिष्ट्य असलेल्या मकर राशीचे वार्षिक राशिभविष्य 2022.

capricorn व्यवसाय व आर्थिक स्थिती

व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यवसायातील मोठी आर्थिक गुंतवणूक शक्यतो टाळावी. कोणतेही मोठे व्यवहार करत असताना बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करावा. कोणत्याही करारावर चारवेळा तपासून पाहिल्याशिवाय सही करू नये. आपली कोणत्याही प्रकाराने फसवणूक होत नाही याची काळजी घ्यावी. फक्‍त साडेसाती असल्यामुळे साधकबाधक विचार करून निर्णय घ्यावेत व धाडस करताना अधिक विचार करावा.
व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्‍तींना दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड अधिक चांगला आहे. दि. 12/04/2022 पर्यंतच्या कालखंडात आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. जुने येणे वसूल होईल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या कार्यामध्ये व व्यवसायामध्ये सफलता प्राप्‍त होईल. तेव्हा साडेसातीची अधिक काळजी न करता आपण व्यवसायाकडे लक्ष द्यावे. मात्र, दैनंदिन व्यवहारात आपल्याला समाधानकारक परिस्थिती आहे. फक्‍त मोठे आर्थिक व्यवहार करताना प्रॉपर्टी आदी विशेष गोष्टी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभासाठी चांगले आहेत.

दि. 12/02/2022 ते दि. 24/03/2022
दि. 28/04/2022 ते दि. 12/07/2022
दि. 25/09/2022 ते दि. 24/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 17/12/2022

नोकरी

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. नोकरीतील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्‍लामसलतीशिवाय घेऊ नयेत. मकर राशीच्या व्यक्‍तींना नोकरीच्या दृष्टीने दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड अधिक चांगला आहे. या कालखंडात नोकरीसंदर्भात समाधान लाभेल. काहींना बढती मिळण्याची जोरदार शक्यता आहे. काहींना पगारवाढीची शक्यता आहे. मात्र, बदलीसंदर्भात फार मोठ्या आशा मनात ठेवू नका. काहींची चुकीच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे.

नोकरीतील व्यक्‍तींना खालील कालखंड अनुकूल आहे.

दि. 01/04/2022 ते दि. 14/04/2022
दि. 27/04/2022 ते दि. 12/07/2022
दि. 16/07/2022 ते दि. 16/08/2022
दि. 18/09/2022 ते दि. 24/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 05/12/2022

प्रॉपर्टी

प्रॉपर्टी व गुंतवणुकीसाठी हे वर्ष सर्वसामान्य आहे. परंतु; ज्यांना प्रॉपर्टीचे व्यवहार करायचे आहेत. जागा, जमिनी, प्लॉट, फ्लॅट, बंगला, वाहन घ्यायचे आहे, त्यांना
खालील कालखंड अनुकूल ठरतील.
दि. 07/04/2022 ते दि. 17/05/2022
दि. 26/06/2022 ते दि. 14/10/2022
दि. 18/10/2022 ते दि. 11/11/2022

संततिसौख्य

संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, त्यांचे शाळा, कॉलेजचे प्रवेशाचे प्रश्‍न, त्यांचे परीक्षेतील यश, नोकरी-व्यवसायाचे प्रश्‍न व एकूणच प्रगती या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक स्वरूपाचे ठरणार आहे. संपूर्ण वर्षभर राहू आपल्या पंचमस्थानात म्हणजे संततीच्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये लक्ष न लागणे किंवा कष्ट करण्याची इच्छा न होणे अशाप्रकारच्या गोष्टी होऊ शकतात.
संततिसौख्याच्या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक आहे. काहींच्या मुलामुलींचे नोकरीचे प्रश्‍न समाधानकारकरीत्या सुटतील. दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हाही चांगला आहे.

खालील कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने चांगले जातील.

दि. 01/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 25/09/2022 ते दि. 04/12/2022

वैवाहिक सौख्य

मकर राशीच्या व्यक्‍तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य स्वरूपाचे राहणार आहे. वैवाहिक जीवनातील मतभेद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. परस्परांचे विचार समजून घ्याल. तुमच्यामध्ये अधिक समजूतदारपणा निर्माण होईल. परस्परांमधील सामंजस्य वाढेल. प्रत्येक गोष्टीचा शांतपणे, संयमाने व दूरगामी विचार करून वागाल व निर्णय घ्याल. नोकरी, व्यवसायातील जबाबदारी, कामाचा ताण व सर्व क्षेत्रांमध्ये जबाबदारीतील वाढ, यामुळे आपणाला कौटुंबिक व घरगुती कामाकडे फारसे लक्ष देता येणार नाही. मात्र, मकर राशीच्या मुलामुलींचे विवाह जमणे व होणे या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले आहे.

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने खालील कालखंड अनुकूल आहेत.

दि. 28/04/2022 ते दि. 23/06/2022
दि. 18/08/2022 ते दि. 31/08/2022
दि. 25/09/2022 ते दि. 05/12/2022

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. परंतु; यावर्षी मकर राशीच्या व्यक्‍तींना साडेसाती सुरू आहे. त्यामुळे प्रवास, तीर्थयात्रा यासाठी नोकरी, व्यवसायातील कामाची व्याप्‍ती अधिक असल्यामुळे यावर्षी प्रवासाला कमी संधी लाभणार आहे. तरी ज्यांना प्रवास, तीर्थयात्रा करायचे आहेत, त्यांना खालील कालखंड अनुकूल आहेत.

खालील कालखंड प्रवास, तीर्थयात्रा यासाठी अनुकूल जातील.

दि.07/04/2022 ते दि. 13/07/2022
दि. 20/08/2022 ते दि. 02/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

सार्वजनिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यामध्ये यश, मानसन्मान, प्रतिष्ठा, अधिकार योग या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले आहे. जरी साडेसाती असली तरीसुद्धा खालील कालखंडात सार्वजनिक व राजकीय दृष्टीने किंवा सामाजिक दृष्टीने काहींच्या बाबतीत काही चांगले घडेल.

खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने लाभदायक आहेत.

दि. 12/02/2022 ते दि. 14/03/2022
दि. 15/04/2022 ते दि. 31/08/2022
दि. 18/09/2022 ते दि. 11/11/2022

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी यासंदर्भात मकर राशीच्या व्यक्‍तींना यावर्षी चांगली संधी लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला काम करण्यासाठी चांगले वातावरण लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. विशेषत: शैक्षणिक कार्यात व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभणार आहे. सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल.

खालील कालखंड सुसंधी,प्रसिद्धी यासाठी अनुकूल आहेत.

दि. 06/03/2022 ते दि. 23/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 31/08/2022
दि. 10/09/2022 ते दि. 05/12/2022

सारांश

मकर राशीच्या व्यक्‍तींना साडेसाती संपूर्ण वर्षभर असणार आहे. यामुळे यश मिळाले, संधी मिळाली, काही अनुकूल गोष्टी घडल्या तरी काही ना काही परिणाम होणारच नाहीत असे धरून चालू नका. विशेषत: मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळणे, बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करणे व कोणताही निर्णय घेताना साधकबाधक विचार करणे, जागरूकता ठेवणे व सावधगिरी बाळगणे गरजचे आहे. साडेसाती म्हणजे साडेसातीतील प्रत्येक दिवस वाईट जातो असे नाही. परंतु; एखादी घटना अशी घडते की, त्यामुळे बर्‍याचशा कटकटी निर्माण होऊ शकतात. नोकरी, व्यवसायात आर्थिक प्रगती होणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रतिष्ठा लाभेल. संपूर्ण वर्षभर गुरूची अनुकूलता आहे. शुभ कार्यासाठी संपूर्ण वर्ष चांगले आहे. फक्‍त जागरूकता व सावधानता एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आरोग्याच्या संदर्भापासून ते प्रतिष्ठेच्या संदर्भापर्यंत जे काही कालखंड सांगितले आहेत, त्यामध्ये कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. याचे कारण मकर राशीच्या व्यक्‍तींना साडेसातीची झळ यावर्षी मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. विशेषत: वैवाहिक जीवनामध्ये व शुभ कार्यासाठी संपूर्ण वर्ष अनुकूल असले तरी साडेसातीमुळे विवाहेच्छूंचे विवाह सहजासहजी जमणार नाहीत. ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचे मतभेद आहेत, ते यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात धाडस करताना विचार करावा. नोकरीमध्ये संयमी भूमिका घ्यावी. प्रत्येक गोष्टीत जागरूकता, सावधानता हवी. वाहने चालविताना प्रवासात जागरूकता हवी. यावर्षी जबाबदारी वाढणार आहे. त्यात साडेसातीची भर आहे. त्यामुळे संपूर्ण वर्ष गुरू अनुकूल असला तरी साडेसातीची प्रतिकूलता मकर राशीच्या व्यक्‍तींना नजरेआड करता येणार नाही. यावर्षी प्रथमस्थानात शनी आहे. हा शनी आपली जबाबदारी वाढविणार आहे. यावर्षी आपण अधिक गांभीर्याने, जबाबदारीने व विचारपूर्वक निर्णय घ्याल. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार, व्यवसायातील कामे शक्यतो दि. 12/04/2022 पूर्वी उरकून घ्यावीत. तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर शक्यतो दि. 12/04/2022 पूर्वी नवीन व्यवसायाचा शुभारंभ करू शकता. दि. 12/04/2022 नंतरचा जो कालखंड आहे, तो आपणाला संधी मिळणारा आहे. साहित्य, संगीत, कला, नाट्य, लेखन, प्रकाशन या क्षेत्रांमध्ये आपणाला सुसंधी लाभू शकते. दि. 12/04/2022 नंतर आपली वाट योग्य दिशेने सुरू राहणार आहे. प्रवासाचे, तीर्थयात्रेचे विशेष योग येतील. धार्मिक कार्याकडे आपला विशेष कल राहील. तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रांचे, सहकार्‍यांचे आपणाला विशेष सहकार्य लाभणार आहे. फक्‍त कौटुंबिक जीवनात थोड्याफार अडचणींना, काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आपला जर भागीदारीत व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात थोड्याफार अडचणी येतील. यावर्षी मकर राशीच्या व्यक्‍तींना साडेसातीचा विशेष त्रास होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सावधगिरी व जागरूकता हवी.

– प्राचार्य रमणलाल शहा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news