'शेतकऱ्यांना चिरडून मारलेले चालते आणि शेतकऱ्यांनी निषेध केल्यानंतर तुमची सुरक्षा धोक्यात ? कसे चालेल?' | पुढारी

'शेतकऱ्यांना चिरडून मारलेले चालते आणि शेतकऱ्यांनी निषेध केल्यानंतर तुमची सुरक्षा धोक्यात ? कसे चालेल?'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (दि.०५) पंजाब दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांच्या जीवाला धोका असल्याने पंतप्रधानांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द केला. ते पंजाबच्या फिरोजपूर येथे सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे हा दौरा रद्द केला.

दरम्यान फ्लायओव्हवर त्यांचा ताफा २० मिनिटे अडकून पडलेला होता. यामुळे नियोजीत दौरा रद्द करत होणारी रॅलीही रद्द करण्यात आली. दरम्यान, यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू असताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यात उडी घेतली आहे. (PM Modi Security Breach)  दुसरीकडे सोशल मीडियामध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ट्विट आणि कू मध्ये म्हटले की, ही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी आहे की शेतकऱ्यांचा राग?. दरम्यान राकेश टिकैत यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेले कू आणि ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणामुळे रॅली रद्द करण्याची बोलले जात आहे.

PM Modi Security Breach : सुरक्षेत कुचराई आहे की शेतकऱ्यांचा रोष…

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना डिवचत म्हणाले की, रिकाम्या खुर्च्यांबद्दल बोलून पंतप्रधानांनी पुन्हा येण्यास सांगितले होते. यावर बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, सुरक्षेत कुचराई आहे की शेतकऱ्यांचा रोष आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. यावरून मात्र, सोशल मीडियामध्ये नेटकरी चांगलीच मजा घेत आहेत.

यावर सोशल मीडिया युजर रामावतार मीणा म्हणतात की, पंतप्रधान, तुमचे गृहराज्यमंत्री अजय टेनी यांनी शेतकर्‍यांना वाहनांनी चिरडून मारले तर ठीक, पण शेतकर्‍यांनी निषेध नोंदवला तर तुमची सुरक्षा धोक्यात आली ? हे असे कसे चालेल पंतप्रधान साहेब ? तर एका नेटकऱ्याने कोणीतरी स्वतःची फसवणूक करत आहे, टिकैत जी असे उत्तर दिले आहे.

जास्मिन नावाच्या युजरने शेतकरी नेत्याच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, खुर्चीवर बसणाऱ्यांनीच रस्त्यावर बसवून तमाशा निर्माण केला आहे.

पंजाबच्या नावावर राजकारण केले जात आहे. आम्ही सर्वांना हात जोडून नमस्कार करतो, पंजाबची नासधूस थांबवा. जीके सिंग नावाच्या युजरने म्हणतो की, खुर्च्या रिकाम्या आहेत की भरल्या आहेत, रस्ता का अडवला गेला? रॅलीच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचण्यात पंजाब सरकार का अपयशी ठरले?

Back to top button