Mumbai Municipal : मुंबई महानगरपालिकेतील १७२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना | पुढारी

Mumbai Municipal : मुंबई महानगरपालिकेतील १७२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरानाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मुंबई महानगरपालिकेतील सुमारे ६ हजार ९०० कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यात १०० पेक्षा जास्त जणांनी आपला प्राण गमावला. (Mumbai Municipal)

आता पुन्हा तिसऱ्या लाटेत १७ डिसेंबरपासून आतापर्यंत १७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह नगरसेवक व अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च २०२० पासून आतापर्यंत ७ हजारापेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Mumbai Municipal)

तिसर्‍या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांसह वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठांमध्ये उपायुक्त पदावरील चार अधिकारी बाधित झाले आहेत. याशिवाय महापालिका हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Mumbai Municipal : लसीकरणामुळेही मृत्यूदरात घट

ओमायक्रॉन विषाणूमुळे जीवितहानी कमी होत असल्याचे निष्कर्ष जगभरातील आकडेवारीतून समोर आले आहे.
मागील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यू दर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यू दर कमी असल्याचे दिसून येते. मृत्यूदर कमी होण्यात लसीकरणाचाही मोठा हातभार आहे.

राज्यात जवळपास 85 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. तर, 60 टक्क्यांहून अधिक नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
पहिल्या दोन लाटा व राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने समूह प्रतिकारकशक्ती तयार झाल्याने बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणातूनच बरे होताना दिसत आहेत.

विविध इतिहासाचा आजार असलेले, वेगवेगळ्या कारणांनी कमी प्रतिकारकशक्ती असलेले आणि ज्येष्ठ नागरिक आदींनाच ओमायक्रॉनचा धोका राहील, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button