वर्धा : रामाळा तलावात मासेमारीच्या जाळ्यात अडकला भलामोठा अजगर | पुढारी

वर्धा : रामाळा तलावात मासेमारीच्या जाळ्यात अडकला भलामोठा अजगर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील रामाळा तलावामध्ये मासेमारी करणाच्या जाळात आठ फुट लांबीचा भला मोठा अजगर अडकल्‍याची घटना बुधवारी ( दि. ५) रोजी पहाटे उघडकीस आली. इको-प्रोच्या सर्पमित्रांनी अजगराला रेस्क्यू करून सुरक्षितरित्या वनविभागाच्या मदतीने लोहारा जूनोना जंगलात सोडले.

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रामाळा तलावाचे खोलीकरणाचे कामासाठी तलावातील पाणी सोडण्यात आले होते. तर याच दरम्यान तलावात काही भागात पाणी साचलेले आहे. त्या पाण्यात मासेमारी सुरू असून तिथे टाकण्यात आलेल्या मासेमारीच्या जाळ्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास भलामोठा अजगर अडकला. ही घटना मासेमारी करण्याच्या लक्षात आली. यानंतर अजगर अडकल्याची माहिती इको-प्रोचे बंडू धोतरे यांना देण्यात आली.

बंडू धोतरे हे आपले सहकारी सर्पमित्र राजेश व्यास यांच्यासह लगेच रामाळा तलावाच्या पात्राच्या ठिकाणी पोहोचले. यानंतर त्यांनी पाहणी केली असता जवळपास आठ फूट लांबीचा अजगर जाळात अडकल्याचे निदर्शनास आले. पाणी वाहून येणा-या नाल्यामधून हा अजगर साप आला असावा, अशी शक्यता सर्पमित्रांनी वर्तवली. सर्पमित्रांनी अजगरास सुरक्षितरित्या स्क्यू केले. यावेळी मासेमारी करणाऱ्या भोई बांधवानी अजगर रेस्क्युच्या कामात सहकार्य केले.

लोहारा-जुनोना जंगलात अजगराला सोडले

रामाळा तलावात अजगराला रेस्क्यु करून पकडल्याची माहिती चंद्रपुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांना देण्यात आली. अजगराला चंद्रपूर आरआरयुच्या ताब्यात देऊन तसेच वनविभागाने पंचनामा केल्यानंतर त्यास लोहारा-जुनोना जंगलात सोडण्यात आले.
यावेळी आरआरयुचे वनपाल भीमराव वनकर, वनरक्षक डेवीड दुपारे, किशोर डांगे, संभा पोईनकर, अंकीत पडगेलवार इको-प्रो चे बंडू धोतरे व सचिन धोतरे उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button