new rules 2022 : १ जानेवारी पासूनचे हे आर्थिक बदल माहीत आहेत का? | पुढारी

new rules 2022 : १ जानेवारी पासूनचे हे आर्थिक बदल माहीत आहेत का?

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : नवीन वर्षात काही महत्त्वाचे आर्थिक बदल ( new rules 2022 ) होत आहेत. त्यांची माहिती नसेल तर तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. तर काही नियम असे आहेत, जे न पाळल्याने काही महत्त्वाच्या सुविधांपासून तुम्ही वंचित राहू शकता.

नवीन वर्षांतील काही महत्त्वाचे बदल पुढील प्रमाणे आहेत. ( new rules 2022 )

१. ATM मधून कॅश काढणे महाग पडणार ( new rules 2022 )

१ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महाग होणार आहे. इतर बँकांच्या एटीएममधून कॅश काढताना मेट्रो शहरात ग्राहकांना ३ व्यवहार मोफत आहेत. तर नॉन मेट्रोमध्ये ५ व्यवहार मोफत आहेत. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर पूर्वी २० रुपये इतका आकार लागत असे. १ जानेवारी २०२२पासून हा आकार २१ रुपये होत आहे.

२. India Post Payment Bank मध्ये डिपॉजिट आणि पैसे काढताना शुल्क लागणार ( new rules 2022 )

विहित मर्यादेपेक्षा जादा रकम डिपॉजिट ठेवताना किंवा रक्कम काढताना India Post Payments Bank (IPPB)मध्ये शुल्क घेतले जाणार आहे. हा बदल ही १ जानेवारीपासून अंमलात येणार आहे. प्रत्येक महिन्याला दहा हजारपर्यंतची रक्कम सेव्हिंग करताना त्यावर आकार नसेल. पण त्यापेक्षा जास्त रकमेवर ०.५० टक्के इतके शुल्क किंवा कमीतकमी २५ रुपये आकार घेतला जाणार आहेत. तसेच २५ हजारपर्यंत कॅश महिन्याला मोफत काढता येईल पण त्यापेक्षा जास्त रकमेवर ०.५० टक्के किंवा कमीतकमी २५ रुपये शुल्क असेल.

इनकम टॅक्स रिटर्न

२०२० – २०२१ या आर्थिक वर्षांतील इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ होती. १ जानेवारीनंतरही आपण रिटर्न भरू शकता, हा रिटर्न ३१ मार्च २०२२पर्यंत भरता येईल. पण हा रिटर्न भरताना ५००० रुपयांचा दंडही होणार आहे. जर उत्पन्न ५ लाखापेक्षा कमी असेल तर हा दंड १ हजार रुपये इतका आहे.

SEBIची गुंतवणुकदार सर्व्हिस रिक्वेस्ट

१ जानेवारीपासून पॅन कार्डमधील बदल, सही, वारसदार, पत्ता, बँक डिटेल्स, शेअर्सचे डुप्लिकेट सर्टिफिकेट, कॉन्सोलिडेटेड सर्टिफिकेट यात बदल करण्याचे नियम सेबीने सुटसुटीत केलेले आहेत.

Back to top button