तर पुन्हा शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांचा सूचक इशारा

तर पुन्हा शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांचा सूचक इशारा

जयपूर, पुढारी ऑनलाईन :शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार चालढकल करत आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करू, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला. शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने वारंवार विनंती करून मागण्या मान्य केल्याचे सांगितले. मात्र, एमएसपीबाबत कायदा करण्यासाठी सरकार संथगतीने काम करत आहे असा आराोप टिकैत यांनी केला.

ते म्हणाले, 'सरकारने सध्या केवळ तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. आमचया उर्वरित मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. आश्वासनांची पूर्तता न केल्यास पुन्हा आंदोलन होऊ शकते. केंद्र सरकारने सध्या केवळ तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र त्यांनी एमएसपी बाबत कायदा केलेला नाही. समिती स्थापन करण्याबाबत सरकार निश्चितपणे बोलले आहे, पण सरकार अतिशय संथगतीने काम करत आहे. आमची आश्वासने पूर्ण न झाल्यास शेतकरी पुन्हा आंदोलन करू शकतात. तसेच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर पुन्हा कृषी कायदे आणण्याची भाषा करत आहेत. हे आम्ही चालू देणार नाही.'

उत्तरप्रदेश निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले. खासदार असदुद्दीन ओवेसी हे भाजपपेक्षा जास्त धोकायदायक आहेत. त्यांच्यापासून जनतेनेच सावध रहावे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रदेशातील शेतकरी फायदा मिळवून देणाऱ्या राजकीय पक्षालाच मतदान करतील.'

शेतकरी आंदोलन राकेश टिकैत : शेतकरी नेते लढविणार निवडणुका

पंजाबच्या २२ शेतकरी संघटनांनी शनिवारी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनांनी 'संयुक्त समाज मोर्चा' हा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाचे नेतृत्व शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल करणार आहेत. या संघटनांचा पक्ष राज्यातील ११७ जागा लढवणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news