पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पाच जणांवर गुन्हा | पुढारी

पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पाच जणांवर गुन्हा

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा

सिंहगडाच्या पायथ्याला अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार निलेश नेटके (वय २१), लक्ष्मण पाटील (वय २२) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील संशयित आरोपी निलेश नेटके याला पोलिसांनी अटक केली असून, लक्ष्मण पाटील हा फरार आहे. तीन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग आहे असे हवेली पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे खडकवासला, सिंहगड, पानशेत भागात खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले, आरोपींनी अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ तयार केले. घडलेला प्रकार कोणाला सांगू नये यासाठी तिला धमकावण्यातही आले. त्यामुळे मुलगी व तिचे नातेवाईक भयभीत झाले होते. पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांना विश्वासात घेतल्यानंतर पीडितेने या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा

Back to top button