Operation Sindoor | दिल्ली विमानतळावरून ९० उड्डाणे रद्द!

भारत - पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय | देशातील अनेक विमानतळही बंद
Operation Sindoor
File Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. दरम्यान, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. गुरूवारी जवळपास ९० उड्डाणे रद्द करण्यात आली. यापैकी दिल्लीहून निघणारी ४६ उड्डाणे आणि येणारी ३३ देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याच वेळी, वेगवेगळ्या देशांमधून येणारी ६ उड्डाणे आणि दिल्लीहून वेगवेगळ्या देशांना जाणारी ५ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

विमान कंपन्यांच्या प्रवाशांसाठी सूचना

भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान कंपन्यांनी १० मे पर्यंत काही उड्डाणे रद्द केली आहेत तसेच प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला. कोणताही त्रास टाळण्यासाठी प्रवासी हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करू शकतात, असेही विमान कंपन्यांनी म्हटले आहे.

देशातील अनेक विमानतळ बंद

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पुढील काही दिवसांसाठी भारतातील अनेक विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद आहेत. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, अकासा एअर, एअर इंडिया एक्सप्रेससारख्या विमान कंपन्यांची शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news