केंद्रीय मंत्रालयांमध्ये हजारो नोकऱ्या; उद्या कर्मचारी निवड आयोग अधिसूचना जारी करणार | पुढारी

केंद्रीय मंत्रालयांमध्ये हजारो नोकऱ्या; उद्या कर्मचारी निवड आयोग अधिसूचना जारी करणार

पुढारी ऑनलाईन: केंद्र सरकारची मंत्रालये आणि संबंधित विभागांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि एसएससी सीजीएल (SSC Combined Graduate Level Exam) परीक्षा २०२१ ची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सीजीएल परीक्षा 2021 साठी कर्मचारी निवड आयोगाद्वारे 23 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचना काढण्यात येणार आहे. सीजीएल परीक्षा 2021 ची अधिसूचना आयोगाकडून अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर प्रसिद्ध केली जाईल. अधिसूचना जारी झाल्यानंतर, सीजीएल 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू होईल. इच्छुक उमेदवार आयोगाच्या वेबसाइटवर नोंदणी करून प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज सादर करू शकतील. सीजीएल परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2022 आहे.

Union Ministry of Health : ओमायक्राॅनचा धोका वाढतोय

एसएससी सीजीएल परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा नियमाप्रमाणे शिथिल आहे. तसेच अधिक तपशीलांसाठी एसएससीने प्रसिद्ध केलेली अधिसूचना 2021 पाहावी.

Allahabad High Court : वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा दावा, हायकोर्टाने म्हटले, वडिलांच्या नाही तर तू तुझ्या स्वतःच्या घरात रहा!

केंद्रीय मंत्रालयात हजारो सरकारी नोकऱ्या

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि त्यांच्या संबंधित विभागांमध्ये गट ब (अराजपत्रित) आणि गट क पदांच्या घोषित रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड कर्मचारी निवड आयोगाद्वारे दरवर्षी केली जाते. या भरती प्रक्रियेअंतर्गत दरवर्षी हजारो नोकऱ्या दिल्या जातात. 2020 च्या सीजीएल परीक्षेबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी या भरतीसाठी 6500 हून अधिक रिक्त जागा घोषित करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी, 2019 च्या परीक्षेसाठी मंत्रालये आणि विभागांमध्ये 8500 हून अधिक रिक्त पदे भरतीसाठी काढण्यात आली आहेत.

Back to top button