पूढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये अनेकजण लग्न करताना दिसत आहेत. अलिकडे बॉलिवूड कलाकारांची लग्न ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैप हे नूकतेचं विवाहबध्द झाले. याची चर्चा सोशल मीडियावर खूप हाेत आहे. फक्त सेलिब्रीटी आणि धनाढ्य लोकांच्या लग्नाची चर्चा होते असं नाही. प्रत्येकाला वाटतं की आपलं लग्न हे अविस्मरणीय व्हावं. यासाठी भन्नाट कल्पना करत असतात. अगदी पेहरावापासून ते सामाजिक कार्य, लग्न मंडपातील एन्ट्री, खर्च अशा या ना त्या कारणाने आपल्या लग्न अविस्मरणीय करण्यासाठी हे प्रयत्न असतात. अशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथे घडली आहे.