Bank jobs : बंपर भरती; एनबीएफसी, खासगी बँकांत ३ वर्षांत ७० हजार नोकऱ्यांची संधी

Bank jobs : बंपर भरती; एनबीएफसी, खासगी बँकांत ३ वर्षांत ७० हजार नोकऱ्यांची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतातील अनेक बँकिंग आणि नॉन-बँकिंग वित्त कंपन्यांमध्ये पुढील काही वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी (Bank jobs) उपलब्ध होणार आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बँकिंग क्षेत्रात पुढील तीन वर्षांत ७० हजार फ्रेशर्संना संधी मिळणे अपेक्षित आहे, असे स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनी टीमलीज सर्व्हिसेसने म्हटले आहे.

बँका, वित्त सेवा आणि विमा (banking, financial services, and insurance) या क्षेत्रात ग्राहक केंद्रीत एंट्री लेव्हल स्तरावरील नोकऱ्यांमध्ये २५ टक्के फ्रेशर्संना संधी मिळणे अपेक्षित आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या पगाराचा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील रिकव्हरीचा बँका, वित्त सेवा आणि विमा क्षेत्रात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसत आहे असे टीमलीज सर्व्हिसेसचे हेड अमित वडेरा यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञान आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढीचा परिणाम बीएफएसआय क्षेत्रावर होत आहे; ज्यामुळे फ्रेशर्संना (Bank jobs) संधी मिळेल अशी अपेक्षा वडेरा यांनी व्यक्त केली आहे.

आयसीआयसीआय होम फायनान्सचे ६०० कर्मचाऱ्यांच्या भरतीचे उद्दिष्ट आहे. तर कोटक महिंद्रा बँकेनेदेखील नवीन भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर बोलताना श्रीराम सिटी युनियन फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक वायएस चक्रवती यांनी म्हटले आहे की, आमचे विक्री, क्रेडीट, वसुली पातळीवर वृद्धी करण्याचे नियोजन आहे. आम्ही गृहकर्ज, वित्तपुरवठा आणि क्रॉस-सेल व्हर्टिकल्स यासारख्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये नवीन भरती करत आहे. कंपनी असे वितरण मॉडेल विकसित करत आहे ज्यामुळे त्याचा ग्रामीण भागात विस्तार होण्यास मदत होईल.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेनंतर अर्थव्यवस्था कोलमडली होती. यामुळे वित्त क्षेत्रातील नोकर भरती थांबली होती. पण, सणासुदीच्या हंगामामुळे अर्थव्यवस्थेने पुन्हा उभारी घेतली आहे. यामुळे नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news