पुढारी ऑनलाईन डेस्क : Omicron India First Case : भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्या डॉक्टरांच्या निगरानी खाली या रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या डॉक्टरांनी ओमायक्रॉन घातक आहे की नाही याबाबत माहिती दिली.
ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाला थोडा ताप, अंगदुखी आणि चक्कर येण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. परंतू तो ठणठणीत असल्याचे सांगत आहे.
संसर्गादरम्यान त्यांचे अनुभव सांगताना डॉक्टर म्हणाले की, काळजी करण्यासारखे काही नाही. कारण त्यांना श्वास घेण्यात फारसा त्रास होत नव्हता. कोरोनाच्या इतर व्हेरियंटनुसार त्याला सर्दी किंवा ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचा त्रासही जाणवला नाही. दरम्यान ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर त्याने स्वतःला आयसोलेशन केले होते आणि कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या संपर्कात आला नव्हता.
RT-PCR चाचणीनंतर तो पॉझिटिव्ह आढळला. कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस आधीच त्याने घेतले होते.
डॉक्टरांनी सांगितले की ते तीन दिवस घरीच होते. पण उलट्या आणि चक्कर आल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ओमायक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीला २१ नोव्हेंबरला सौम्य लक्षणे जाणवू लागली. पण त्या व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल ९६ ते ९७ होती. पण त्या रुग्णाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता म्हणून ते रुग्णालयात तातडीने दाखल झाले.
पहिले दोन दिवस उलटी, थंडी, ताप आणि अंग दुखीसारखी लक्षणे आढळली. पहिल्या दोन दिवसांच्या उपचारानंतर मी अगदी ठणठणीत बरा झाल्याचे त्या रुग्णाकडून सांगण्यात आले. जेव्हा तो पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळला, त्यानंतर जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संसर्ग झाल्यानंतर कोविडमधून बरे होण्यास सुमारे दोन आठवडे लागतात. यामुळे त्याला आणखी सात दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल आणि आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आल्यानंतरच रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.