UPA : संजय राऊत, “काॅंग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही” | पुढारी

UPA : संजय राऊत, "काॅंग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही"

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी रात्री काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांची केवळ एक मोर्चा असायला हवा. ममता बॅनर्जी यांनी युपीएवर केलेल्या वक्तव्यावर राऊतांनी सांगितलं की, काॅंग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही आणि राहुल गांधी त्या आघाडीचं नेतृत्व करावं.

“शिवसेनेने यापूर्वीच सांगितलं आहे की, काॅंग्रेसशिवाय विरोध पक्षांची आघाडी शक्यच नाही. महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीचे सरकार आहे, ते ही मिनी युपीएसारखंच आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आहे. तर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस सहकारी पक्ष आहे”, असे मत संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, “राहूल गांधींशी चर्चा करणं गरजेचं आहे. राजकीय चर्चा झाली आहे आणि त्यामध्ये सर्वकाही ठीक आहे. जी चर्चा झाली ती सर्वांत पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी सांगणार आहे. राहूल गांधी मुंबईत येणार आहेत. २७-२८ तारखेच्या दरम्यान एका कार्यक्रमात ते येण्याची शक्यता आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होईल.”

हे वाचा…

Back to top button