नालंदा : जगातील पहिल्या निवासी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ते नष्ट कसे झाले?

नालंदा विद्यापीठ
नालंदा विद्यापीठ
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये नालंदा विद्यापीठाचे उद्घाटन झाले. ज्या ठिकाणी प्राचीन नालंदा विद्यापीठ होते, त्या राजगिरपासून काही अंतरावर हे नवे विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. १६०० वर्षांपूर्वी राजगिर येथे हे प्राचीन विद्यापीठ होते. येथे शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असत.

नालंदा विद्यापीठ कोणी उभारले होते?

प्राचीन काळातील मगध साम्राज्यात म्हणजे आताच्या बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ होते. प्राचीन शहर राजगृह किंवा आताचे राजगिरी येथे हे विद्यापीठ स्थित होते. हे ठिकाणा प्राचीन पाटलीपुत्रपासून जवळ आहे. या विद्यापीठात चीन, कोरिया, जपान, तिबेट, श्रीलंका अशा विविध देशातून विद्यार्थी शिकायला येत होते.
अधिक वाचा –
नालंदा विद्यापीठात आयुर्वेद, बौद्धधर्म, गणित, व्याकरण, अवकाशशास्त्र, भारतीय अर्थशास्त्र असे विषय शिकवले जात होते. ८ व्या आणि ९ व्या शतका पल राज्यांच्या कारकिर्दीत या विद्यापीठाने मोठा नावलौकीक मिळवला होता. गणित आणि अवकाशशास्त्र या दोन विषयात या विद्यापीठाने जगभर नाव कमावले होते. शुन्याची संकल्पान मांडणारे आर्यभट्ट ६व्या शतकात या विद्यापीठात शिकवत असत.
अधिक वाचा –
या विद्यापीठात प्रवेश मिळणे त्या काळी फार कठीण गोष्ट होती. विद्यार्थ्यांची पडताळणी, मुलाखती होऊन या विद्यापीठात प्रवेश मिळत असे. या विद्यार्थ्यांना बौद्ध धर्मातील त्या काळातील नामवंत तज्ज्ञ धर्मपाल आणि शिलभर्द यांचे मार्गदर्शन मिळत असे. या विद्यापीठातील ग्रंथालय धर्म गुंज या नावाने प्रसिद्ध होते. त्या काळात या ग्रंथालयात ९० लाख हस्तलिखित संग्रहित करण्यात आली होती.
नालंदा विद्यापीठ कसे नष्ट झाले?
1190साली तुर्क-अफगाणी बख्तियार खिल्जी याच्या हल्ल्यात हे विद्यापीठ नष्ट झाले. खिल्जी याच्या हल्ल्यात या विद्यापीठाला आग लावण्यात आली. ही आग ३ महिने धुमसत होती. या आगीत मोठ्या प्रमाणावर हस्तलिखित नष्ट झाली. जी हस्तलिखित या आगीत वाचली ती सध्या लॉस एंजिलस काऊंटी म्युझियम आणि तिबेटमधील यारलुंग म्युझियम या संग्रहालयात जतन करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
१८१२मध्ये स्कॉटिश संशोधक फ्रान्सिस हॅमिल्टन यांनी या विद्यापीठाचा नव्याने शोध लावला. तर १८९१मध्ये सर अलेक्झार कनिंगहॅम यांनी नालंदा हे प्राचीन विद्यापीठ होते, हे सिद्ध करणारे पुरावे सादर केले.

आताचे नालंदा विद्यापीठ कसे आहे?

नव्याने उभे करण्यात आलेले नालंदा विद्यापीठ १०० एकर जागेत पसरले आहे. यामध्ये १९०० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. बुद्धिस्ज स्टडिज, इतिहास, भाषा, साहित्य, आंतरराष्ट्रीय संबंध असे विविध विषय येथे शिकवले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news