नालंदाचे ऑक्‍सफर्ड आणि केंब्रिजच्याही आधीचे अस्‍तित्‍व; खिलजीने का केले उद्ध्वस्त?

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) नालंदा विद्यापीठाचे उद्धाटन केले. आता म्‍हटले जात आहे की, हे विद्यापीठा पुन्हा एका आपल्‍या जुन्या स्‍वरूपात परतत आहे.

नालंदा विश्वविद्यालय हे जवळपास ८०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जुन्या स्‍वरूपात परतत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यापीठाच्या नवीन परिसराचे उद्धाटन केले. विद्यापीठाच्या नवीन कॅम्‍पसच्या उद्घाटनासोबतच विद्यापीठाच्या इतिहासावरही चर्चा होत आहे.

किंबहुना, जगातील पहिले निवासी विद्यापीठ नालंदाचा प्राचीन इतिहास इतका मोठा आहे की त्याबद्दल अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. असे म्हटले जाते की जेव्हा जगात विद्यापीठे बांधली जाऊ लागली तेव्हा नालंदाने आपला शेकडो वर्षांचा वारसा आधीच निर्माण केला होता.

विद्यापीठाच्या नव्या कँम्‍पसचे उद्घाटन होत असताना नालंदाचा इतिहास काय आहे, येथे कोणकोणत्‍या महान लोकांनी अभ्‍यास केला आणि नालंदा कोणत्या प्रकारच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होते?

किती जुने आहे नालंदा?

जेंव्हा जगातील टॉपच्या विद्यापीठांबद्दल बोलले जाते तेंव्हा डोक्‍यात ऑक्‍सफर्ड आणि केंब्रिजचे नाव येते. मात्र नालंदा विद्यापीठ त्‍याहीपेक्षा जुने आहे. नालंदा तीन शब्‍दांनी मिळून बनले आहे. ना, आलम आणि दा. याचा अर्थ असा की, अशी भेटवस्तू ज्याला मर्यादा नाही. हे 5 व्या शतकात गुप्त काळात बांधले गेले आणि 7 व्या शतकात ते एक महान विद्यापीठ बनले.

हा एक मोठ्या बौद्ध मठाचा भाग होता. असे म्‍हटले जाते की याची सीमा जवळपास ५७ एकरमध्ये पसरली होती. यासोबतच अनेक अहवालांमध्ये हे विद्यालय आणखीन मोठे असल्‍याचा दावा केला जातो. काही नोंदीनुसार, ते एका आंब्याच्या बागेवर बांधले गेले होते, जे काही व्यापाऱ्यांनी गौतम बुद्धांना दिले होते.

१९ व्या शतकात सापडले

आधुनिक जगाला या विद्यापीठाबाबत १९ व्या शतकाच्या दरम्‍यान माहिती झाली. हे विद्यापीठ अनेक शतके जमीनीत गाडले गेले होते. 1812 मध्ये बिहारमध्ये स्थानिक लोकांना बौद्धिक पुतळे सापडले, त्यानंतर अनेक परदेशी इतिहासकारांनी त्याचा अभ्यास केला. त्यानंतर याबाबत माहिती मिळाली.

अभ्‍यासासाठी कोण येत होते?

नालंदा विद्यापीठा खूप प्रसिद्ध झाले होते. त्‍या काळी अनेक महान शिक्षकांनी वेळोवेळी आपले संपन्न ज्ञान आपल्‍या विद्यार्थ्यांना दिले होते. या महान शिक्षकांमध्ये नागार्जुन, बुद्धपालिता, शांतारक्षिता आणि आर्यदेव यांचा नावाचा समावेश आहे. तर इथे अध्ययन करणाऱ्या लोकांबाबत बोलायचे झाले तर या ठिकाणी अनेक देशांमधून लोक अध्ययनासाठी येत होते. चीनचे प्रसिद्ध यात्री आणि विद्वान हेन सांग, फाह्यान आणि इत्‍सिंग हे इथे अध्ययनासाठी आले होते. ह्वेन सांग हे नालंदाच्या शीलभद्र यांचे शिष्‍य होते. ह्वेन त्सांग यांनी नालंदा विद्यापीठात 6 वर्षे कायद्याचे शिक्षण घेतले.

कॅम्पस किती मोठा होता ?

या विद्यापीठाची भव्यता इतकी होती की त्यात 300 खोल्या, 7 मोठ्या खोल्या आणि अभ्यासासाठी 9 मजली ग्रंथालय होते. हे विद्यापीठ अनेक एकरात पसरले होते. येथे प्रत्‍येक विषयाच्या अभ्‍यासासाठी ९ मजली ग्रंथालय बनवण्यात आले होते. त्‍या ग्रंथालयात ९० लाखाहून अधिक पुस्‍तके ठेवण्यात आली होती. अस म्‍हंटलं जातं की, जेंव्हा या ग्रंथालयाला आग लावण्यात आली तेंव्हा ३ महिन्यांपर्यंत येथील पुस्‍तके जळत होती. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, या ग्रंथालयात किती पुस्‍तके असतील. या विद्यापीठाची गोष्‍ट हेच सांगते की, भारताचे हे ज्ञान शतकानुशतके जग प्रकाशित करत आहे.

काय शिकवले जात होते?

हे विद्यापीठ ज्ञानाचे भांडार मानले गेले आहे. इथे धार्मिक ग्रंथांशिवाय साहित्य, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र असे अनेक विषय शिकवले जात होते. असे म्‍हटले जाते की, या विद्यापीठात जे विषय शिकवले जात होते ते इतर कोठेही शिकवले जात नव्हते. हे विद्यापीठ 700 वर्षे जगाला ज्ञानाच्या मार्गावर नेत राहिले.

विनाशाची कथा काय आहे?

नालंदाला अनेकवेळा संकटांचा सामना करावा लागला. आपल्‍या ७०० वर्षांच्या मोठ्या यात्रेनंतर १२ व्या शतकात बख्तियार खिलजीने एका आक्रमणात ते जाळून टाकले. असे सांगण्यात येते की, एकदा बख्तियार खिलजी खूप आजारी पडला. त्‍यानंतर त्‍याच्यावर अनेक प्रकारे उपचार करण्यात आले. याच्याशी संबंधीत अनेक गोष्‍टी आहेत. त्‍यामध्ये असे सांगितले जाते की, त्‍याच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांवर नाराज होत त्‍याने हे विद्यापीठ जाळून टाकले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news