जम्मू-काश्मीर : वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १ जवान शहीद, ६ जखमी

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. तर सहा जवान जखमी झाले आहेत. अद्याप चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी आणि कठुआनंतर डोडामध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. तीन दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या कार्यरत तळावर गोळीबार केला.

माहितीनुसार मंगळवारी (दि.११) रात्री उशिरा सुरु झालेल्या जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ आणि डोडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे तर सहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डोडा जिह्यात मंगळवारी (दि.११) डोडा जिल्ह्यात रात्री भदेरवाह-पठाणकोट मार्गावरील ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.  कठुआच्या सैदा सुखल गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. त्यानंतरच्या शोध मोहिमेदरम्यान, एक दहशतवादी मारला गेला आणि सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दुसऱ्या दहशतवाद्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अधिक सुरक्षा तैनात

डोडा येथील लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर झालेल्या गोळीबारात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) जखमी झाले आहेत. जखमी जवानांना इस्पितळात दाखल करण्यात आले  आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी अधिक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news