युक्रेनकडून रशियाचे सुखोई-57 विमान उद्ध्वस्त

युक्रेनकडून रशियाचे सुखोई-57 विमान उद्ध्वस्त

कीव्ह, वृत्तसंस्था : युद्ध सुरू असताना युक्रेनी लष्कराने रशियात घुसून त्यांचा एक सैन्य उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात रशियाचे नवीन आणि अत्याधुनिक सुखोई-57 हे लढाऊ विमान ड्रोनच्या मदतीने उडवून दिले आहे.

युक्रेनी सैन्याने हा हल्ला रशियाच्या अस्त्राखान शहरातील हवाई तळावर केला आहे. हा तळ युद्धभूमीपासून 600 किलोमीटर अंतरावर आहे. सुखाई-57 हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली विमान असून त्याचा वेग ताशी 2 हजार 130 किलोमीटर इतका आहे. हे लढाऊ विमान इतके शक्तिशाली आहे की त्याला नाटोकडून हत्यारा असे (फेलॉन) असे संबोधले जाते. सॅटेलाईटच्या माध्यमातून छायाचित्रे समोर आली असून सात जून रोजी सुखोई-57 हे विमान अस्त्राखान हवाई तळावर दिसत असून आठ जून रोजी त्याठिकाणी आग दिसत आहे.

युक्रेनचा हल्ला इतका भयानक होता की परिसरात केवळ अवशेषच दिसत होते. रशियाजवळ सुखोई-57 ची 32 विमाने आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी 2028 सुखोई-57 ची संख्या 76 वर नेण्याचा निर्धार केला आहे. अस्त्राखान शहरात युक्रेनचे तीन ड्रोन दाखल झाले होते. रशियाने हे ड्रोन पाडले होते, पण सुखोई-57 वर झालेल्या हल्ल्याबाबत रशियाकडून काही सांगण्यात आले नाही. 10 मे रोजी रशियाने खार्किव्हवरील हल्ले वाढवले होते. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडे त्यांनी दिलेली शस्त्रे रशियाविरोधात वापरण्याची परवानगी मागितली होती.

सीमेपासून हाकलण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाविरोधात अत्याधुनिक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती. पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रांच्या मदतीने युक्रेन रशियाला सीमेपासून हाकलून लावत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनीही रशियाविरोधात युक्रेनला शक्तिशाली लढाऊ विमाने देण्याची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news