जम्मूच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला

जम्मूच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील रियासी आणि कठुआनंतर आता डोडामध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. तीन दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या कार्यरत तळावर गोळीबार केला.
या हल्ल्यानंतर डोडा येथील छत्रकला येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात लष्कराचे पाच जवान जखमी झाले आहेत. तर कठुआमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले आहे.

कठुआ जिल्ह्यातील एका घरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्यानंतर काही तासांनंतर डोडामध्ये दहशतवादी हल्ला झाला. डोडा येथील गोळीबारातील जखमींमध्ये एका विशेष पोलीस अधिकाऱ्याचा (एसपीओ) समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काश्मीर टायगर नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

मंगळवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास छत्रकला येथे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यापूर्वी जम्मूचे एडीजीपी आनंद जैन यांनी गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून एक नागरिक जखमी झाल्याचे सांगितले होते.

कठुआमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्येही दहशतवादी हल्ला झाला. काही दहशतवाद्यांनी येथे हवेत गोळीबार करून जंगलाच्या दिशेने पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला. सुरक्षा दलाच्या या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news