Loksabha Election 2024 Result : ईडी-सीबीआयचा टांगती तलवार असलेल्या 9 उमेदवारांना पराभवाचा धक्का

Loksabha Election 2024 Result : ईडी-सीबीआयचा टांगती तलवार असलेल्या 9 उमेदवारांना पराभवाचा धक्का
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीपूर्वी ईडी-सीबीआय या तपास संस्थाच्या कारवाईचा पिच्छा लागलेले भाजप आणि एनडीएतील 13 पैकी 9 नेत्यांना लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात दक्षिण मुंबईतून लढलेल्या यामिनी जाधव, उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून लढलेले भाजप नेते कृपाशंकर सिंह आणि राजस्थानच्या नागौरमधील ज्योती मिर्धा यांचा त्यामध्ये समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत जवळपास 150 पेक्षा जास्त नेत्यांनी पक्ष बदलून निवडणूक लढवली होती. त्यापैकी 13 हुन अधिक नेत्यांवर ईडी-सीबीआय आणि अन्य तपास यंत्रणांच्या तपासाची टांगती तलवार होती. यापैकी 9 नेत्यांचा पराभव झाला आहे. वायव्य मुंबईतून रविंद्र वायकर यांचा विजय झाला. पराभूत झालेल्या यामिनी जाधव शिंदे गटात सहभागी झाल्या होत्या. ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.

कधीकाळी मुंबई काँग्रेसचे नेते असलेले कृपाशंकर सिंह पुढे भाजपमध्ये आले. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीची कारवाई सुरु होती. त्यांनी २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर उत्तरप्रदेशच्या जौनपूरमधून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये तपस रॉय यांच्यामागे ईडीची कारवाई सुरु होती. मार्चमध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. मात्र, कोलकाता उत्तरमधून त्यांचा पराभव झाला.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडीचा तपास सुरु होती. त्यांनी गेल्यावर्षी फेब्रुवारीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, झारखंडच्या सिंहभूम मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरसीपीच्या माजी खासदार कोठापल्ली गीता आणि त्यांचे पती पी रामकोटेश्वर राव यांच्यावर 2015 मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले होते. त्यांनी अऱाकू मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचाही तिथे पराभव झाला.

माजी काँग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांना भाजपने पटियालामधून उमेदवारी दिली होती. त्यांच्या मुलाच्या विरोधात केंद्रीय संस्थेची तपासणी सुरु होती. त्यांचाही पराभव झाला. राजस्थानमध्ये नागौरमधून भाजपच्या ज्योती मिर्धा यांनीही पलटी मारल्याने त्यांचा पराभव झाला. दरम्यान, काँग्रसचे प्रदीप यादव यांच्याविरोधात कारवाई सुरु होती. त्यांनी पक्ष बदलला नाही तरीही त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news