Jalgaon News | 7/12 उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी मागितली लाच, मंडळ अधिकारी जाळ्यात

Jalgaon News | 7/12 उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी मागितली लाच, मंडळ अधिकारी जाळ्यात
Published on
Updated on

जळगाव पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील प्रिपाळा येथील सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी यांनी लाच मागितली. त्यानुसार लाच देतेवेळी सापळा रचून पाच हजाराची लाच स्विकारताना मंडळ अधिकाऱ्याला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्या वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय प्रिपाळा येथे 16 मे रोजी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार 20 मे रोजी तलाठी कार्यालयात सदर प्रकरणा बाबत चौकशी केली असता यातील किरण खंडु बाविस्कर , वय (47) मंडळ अधिकारी सजा प्रिपाळा यांनी 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी 27 मे रोजी लाप्रवि जळगांव कार्यालयात तक्रार दिली. पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता किरण खंडु बाविस्कर यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. 06 जून रोजी किरण खंडु बाविस्कर यांना 5 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

यांनी रचला सापळा

सापळा व तपास अधिकारी. पोलिस उप अधीक्षक, सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली पी.एस. आय. दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ. राकेश दुसाने, पोनि एन.एन. जाधव, पी.एस. आय.सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ. अमोल सुर्यवंशी, पोकॉ. सचिन चाटे यांनी कार्यवाही केली. रामानंदनगर पोलीस स्टेशन जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

हेही वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news