विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची राहुल गाधींना गळ; काॅंग्रेस खासदारांसह ठाकरे गटाची मागणी

राहुल गांधी
राहुल गांधी
[author title="प्रथमेश तेलंग" image="http://"][/author]
नवी दिल्ली : काँग्रेसला ९९ जागा मिळाल्यामुळे संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. या पदासाठी के. सी. वेणूगोपाल आणि मनीष तिवारी यांच्या नावाचीही चर्चा आहे.
तामिळनाडूतील काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मिडीयावरील एक्सवर केलेल्या  पोस्टमधून राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  "राहुल गांधी यांच्या नावावर मी मते मागितली. ते लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावेत, असे मला वाटते, असे टागोर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक टंखा यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. खासदार किर्ती चिदंबरम यांनी देखील हीच मागणी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याबाबत सकारात्कमता दर्शवली आहे. "जर राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील. तर आम्ही आक्षेप का घेऊ? त्यांनी अनेक वेळा राष्ट्रीय नेता म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. ते लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. इंडिया आघाडीमध्ये याविषयी कोणताही आक्षेप आणि मतभेद नाही," असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news