नरेंद्र मोदींच्‍या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ राष्‍ट्र प्रमुखांना निमंत्रण

Narendra Modi
Narendra Modi

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नरेंद्र मोदी शनिवार, ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शेजारील मित्र राष्‍ट्रांच्‍या प्रमुखांना निमंत्रण देण्‍यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएने २९३ जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवले आहे. आता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार आहे. नरेंद्र मोदी यांच्‍या शपथविधी साेहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळी पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि मॉरीशियाचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि भूतानचे राजे ड्रुक ग्याल्पो जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांना गुरुवारपासून निमंत्रण पाठवले जाणार आहेत

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयाच्या मीडिया विभागाने सांगितले की, नरेंद्र मोदींनी त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. ते म्हणाले की, विक्रमसिंघे यांनी निमंत्रण स्वीकारले असून त्‍यांनी फोनवरून मोदींचे निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केले.दरम्यान, जागतिक नेते अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युनून सुक येओल यांच्‍यासह अनेक राष्‍ट्रांच्‍या नेत्‍यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्‍दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी केली बांगलादेशच्या पंतप्रधानांशी फोनवर चर्चा

लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्‍या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशीही मोदींनी फोनवर चर्चा केली. मोदींनी हसीना यांना शपथविधी समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनाही मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुरुवारपासून औपचारिक निमंत्रणे पाठवली जातील

मित्र राष्‍ट्रांच्‍या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे औपचरिक निमंत्रण गुरुवारीपासून पाठवले जाणार आहेत. २०१४ मध्‍ये पंतप्रधान म्हणून मोदींच्या पहिल्या शपथविधी समारंभाला दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचे (सार्क) नेते उपस्थित होते. तर २०१९ मध्‍ये त्यांच्या शपथविधी सोहळ्याला बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह ( BIMSTEC ) या सात दक्षिण आशियाई बांगलादेश , भूतान , भारत , म्यानमार , नेपाळ , श्रीलंका आणि थायलंड देशाचे प्रमुख उपस्‍थित होते.

नरेंद्र मोदी यांचा शनिवारी शपथविधी शक्य

शनिवार, ८ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळू शकले नाही; परंतु भाजप प्रणित 'एनडीए'ला ५४३ पैकी २९३ जागा जिंकल्‍या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news