जळगाव : रन अँड हिट प्रकरणी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगावमधील रामदेववाडी या ठिकाणी झालेल्या कार आणि ओला स्कूटर अपघातामध्ये अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना सोमवारी (दि.27) न्यायालयाने कोठडी सुनावली. या तीन संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

बुधवारी (दि.7 मे) रामदेववाडी या ठिकाणी मोठा अपघात झाला होता . या अपघातामध्ये आईसह दोन लहान मुले आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी अर्णव कौल, अखिलेश पवार आणि ध्रुव सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. सोमवारी (दि.27) या तीन आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले होते. न्यायमूर्ती सोनवणे यांनी दोन्ही पक्षाकडील बाजू ऐकून घेऊन तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या अपघात प्रकरणी तपास अधिकारी डी.वाय.एस.पी संदीप गावित यांनी न्यायालयामध्ये पोलीस कोठडीची मागणी केली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news