प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणूक; सहाव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57.7 टक्के मतदान

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूकीचा सहावा टप्पा आज (दि.२५) पार पडत आहे. सहाव्या टप्प्यात ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील (जम्मू-काश्मीर) ५८ जागांवर मतदान सुरू (Lok Sabha election 2024) आहे.दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशातील 7 राज्यांमध्ये निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 57.7 टक्के मतदान झाले आहे.

पश्चिम बंगालमध्‍ये पाच वाजेपर्यंत तब्‍बल 77.99 टक्के मतदान

सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान टक्‍केवारी पुढीप्रमाणे :  बिहार- 52.24, हरियाणा- 55.93, जम्मू काश्मीर- 51.35, दिल्ली- 53.73 टक्के, ओडिशा – 59.6 टक्के, उत्तर प्रदेश – 52.02 टक्के, पश्चिम बंगाल- 77.99 टक्के आणि झारखंडमध्ये 61.41.

दिल्लीच्या सर्व 7 जागांवर झालेल्या मतदानाव्यतिरिक्त, मतदारांनी उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशातील 6, झारखंडमधील 4 जागा आणि जम्मू आणि काश्मीर मधील एका जागेसाठी मतदान झाले.

दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदानाच्‍या सहाव्‍या टप्‍प्‍यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उप राष्ट्रपती जगदीप धनखर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजप नेते मनोज तिवारी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावला

Lok Sabha election 2024:  दुपारी ३ पर्यंत ४९ टक्के मतदान

  • बिहार ४५.२१ टक्के
  • हरियाणा -४६.२६ टक्के
  • जम्मू काश्मीर – ४४.४१ टक्के
  • दिल्ली – ४४.५८ टक्के
  • ओडिशा – ४८.४४ टक्के
  • उत्तर प्रदेश – ४३.९५ टक्के
  • पश्चिम बंगाल- ७०.१९ टक्के

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news