पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील नारायणपूर-विजापूर-दंतेवाडा या सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये कालपासून चकमक सुरू आहे. गुरूवारी (दि.२४) एकूण आठ नक्षलवादी ठार (Chhattisgarh) करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी ८ शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत छत्तीसगड पोलिस आणि सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान परिसरात अद्याप शोध मोहीम सुरू आहे, अशी माहिती एसपी दंतेवाडा गौरव राय यांनी दिली आहे.
नारायणपूर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. बस्तर, नारायणपूर आणि दंतेवाडा येथील सुमारे १ हजार सुरक्षा रक्षक या मोहिमेत गुंतले होते. दरम्यान या कारवाईत छत्तीसगड पोलिस आणि सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.
हे ही वाचा: