पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी केला होता. मात्र यावर विरोधकांनी त्यांच्यावर तुफान टीका केली होती. याला त्यांनी उत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून त्यादिवशी माझ्यावर टीका करणार्यांनी भरपूर पाणी प्यावे. पाणी शरीरासाठी चांगले असते. यामुळे मेंदू आणि शरीर दोन्हीला संतुलित ठेवेल, असा सल्ला प्रशात किशोर यांनी त्यांच्या टीकाकारांना दिला आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक भाजप जिंकणार, असे मी म्हटलं आहे. आता माझ्या अंदाजांची खिल्ली उडविणार्यांनी २०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील निकालाचे स्मरण करावे. या निवडणुकीत भाजपला तीन अंकी आकडा गाठता आला नव्हता. त्यावेळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा दावा अनेक वृत्तवाहिन्यांनी केला होता.
हिमाचलमधील काँग्रेसच्या खराब निकालाबद्दल बोलले होते, यावर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर प्रशांत किशोरने पाणी प्यायले, ज्यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले होते. यानंतर आता त्यांनी एक्स-पोस्टमध्ये उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्यावर टीका करणार्यांनी भरपूर पाणी प्यावे. पाणी शरीरासाठी चांगले असते. यामुळे मेंदू आणि शरीर दोन्हीला संतुलित ठेवेल, असा सल्ला प्रशात किशोर यांनी त्यांच्या टीकाकारांना दिला आहे.
निवडणूक निकाला दिवशी पाणी सोबत ठेवा, असे का म्हणाले प्रशांत किशोर?

हेही वाचा :