दिल्ली-लखनौ महामार्गावर भरधाव कार दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली; ६ जणांचा मृत्यू

दिल्ली-लखनौ महामार्गावर भरधाव कार दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली; ६ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि.१३) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

गढ कोतवाली येथे मुरादाबादकडे जाणारी निळ्या रंगाची एक्सेल सिक्स कार सुमारे १५ फूट रुंद दुभाजक ओलांडून मुरादाबादहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला धडकली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून जखमींना गढ सीएससीमध्ये पाठवण्यात आले. अपघातानंतर मृतांच्या शरीरातून एवढा रक्तस्त्राव झाला होता की, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news