पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बेमेटारा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. मालवाहू वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच महिला आणि तीन चिमुकल्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २३ जण जखमी झाले आहेत. ४ जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रायपूर एम्समध्ये पाठवण्यात आले आहे.
रविवारी (दि.२८) रात्री उशिरा काथिया गावाजवळ हा अपघात झाला. भुरी निषाद (वय ५०), नीरा साहू (वय ५५), गीता साहू (वय ६०), अगानिया साहू (वय ६०), खुशबू साहू (वय ३९), मधु साहू (वय ५), रिकेश निषाद (वय ६) आणि ट्विंकल निषाद (वय ६) अशी मृतांची नावे आहेत.
अपघातात बळी पडलेले सर्व पाथरा गावातील रहिवासी असून तिरैया गावात एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या २३ जणांना दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार गंभीर जखमींना रायपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नेण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर बेमेत्रा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :