दिल्लीत भाजपचा घरोघरी प्रचार, तर आप, काँग्रेसचाही बैठकांचा धडाका

दिल्लीत भाजपचा घरोघरी प्रचार, तर आप, काँग्रेसचाही बैठकांचा धडाका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपचा दारोदारी जाऊन प्रचार सुरू झाला असून, आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात प्रचाराला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसनेही बैठका सुरू केल्या आहेत.

दिल्लीत सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार

  • भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा प्रचाराला जोरदार सुरुवात
  • अरविंद केजरीवाल यांचे रोड शो, बैठका, सभांचा धडाका
  • भाजपचा दारोदारी जाऊन प्रचार
  • काँग्रेसच्या बूथ बैठका, कॉर्नर सभा सुरू

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील ७ लोकसभा जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. रविवारी (१२ मे) दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दारोदारी जाऊन प्रचार करायला सुरुवात केली. यावेळी वीरेंद्र सचदेवा यांच्यासह कार्यकर्त्यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकांचे वाटप केले. दिल्लीतील भाजपचे लोकसभा उमेदवार मनोज तिवारी, बांसुरी स्वराज यांनीही वेगवेगळ्या भागात रोडशो सुरू केले आहेत.

 दिल्लीत सहाव्या टप्प्यात २५ मेरोजी मतदान

दुसरीकडे आम आदमी पक्षाने लोकसभा प्रचारासाठी अंतरिम जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांचे रोड शो, बैठका, सभांचा धडाका लावला आहे. तर काँग्रेसनेही दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांच्या नेतृत्वात बूथ बैठका, कॉर्नर सभा सुरू केल्या आहेत. उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांनीही आपला प्रचार सुरू केला असून, बैठकांचा धडाका लावला आहे. देशात चार टप्प्यांचा प्रचार आटोपल्यानंतर पाचव्या टप्प्याचा प्रचार सुरु झाला आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news